...त्यामुळे अकोल्यात महाविकास आघाडीची हार आणि भाजपाचा विजय झाला
अकोला : भारतीय जनता पक्षाचे उमेदवार वसंत खंडेलवाल (Vasant Khandelwal) हे 443 मते घेऊन विजयी झाले आहेत तर शिवसेनेचे तथा महाविकास आघाडीचे उमेदवार गोपीकिशन बाजोरिया (Gopikishan Bajoria) यांना 334 मते पडल्याने जवळपास 109 मतांची आघाडी खंडेलवाल यांना मिळाल्याने भाजपच्या गळ्यात विजयाची माळ पडली आहे. बाजोरिया हे चौथ्यांदा या निवडणुकीत उभे होते मात्र ते विजयाचा चौकार मारू शकले नाहीत. या निवडणुकीमध्ये बाजोरिया यांचा पराभूत झालेला आहेत. भाजपचे उमेदवार वसंत खंडेलवाल यांनी त्यांना पराभूत केले आहे.
हे देखील पहा -
विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये (Legislative Council elections) चौथ्यांदा उभे असलेले शिवसेनेचे (Shivsena) विद्यमान आमदार गोपीकिशन बाजोरिया यांना 334 मते मिळाली आहे तर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार वसंत खंडेलवाल यांना 443 मते मिळाली आहेत दरम्यान या निवडणुकीमध्ये 822 मतदारांपैकी 14 मतदारांनी मतदान केले नव्हते तर 808 मतदारांनी मतदान केले होते आज सकाळी सुरू झालेल्या मतमोजणीनंतर अवघ्या दहा वाजेपर्यंत मतदानाचा निकाल बाहेर आला आहे विजयाचा चौकार मारण्याचा आत्मविश्वास गोपीकिशन बाजोरिया यांनी केला होता मात्र मतदारांनी त्यांना नापसंती दाखवली आहे.
शिवसेनेतील गटबाजीमुळे गोपीकिशन बाजोरिया यांचा पराभव झाले असल्याचे बोलल्या जात आहे. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत (Shivsena MP Arvind Sawant) हे मतदानाच्या तीन दिवस आधी पासून अकोल्यात तळ ठोकून होते तरीही शिवसेनेचे उमेदवार गोपीकिशन बाजोरिया यांना विजय गाठता आलेला नाही पक्षांतर्गत गटबाजी मुळे बाजूला यांचा पराभव झाला असल्याचे यावरून दिसून येत आहे.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.