Sanjay Raut Big Statement, Maharashtra Political Crisis, Shivsena Political Crisis, Sanjay Raut News
Sanjay Raut Big Statement, Maharashtra Political Crisis, Shivsena Political Crisis, Sanjay Raut News Saam TV
मुंबई/पुणे

मोठी बातमी! महाराष्ट्राची वाटचाल राष्ट्रपती राजवटीकडे?; संजय राऊत यांचे 'या' ट्विटद्वारे संकेत

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: शिवसेना (Shivsena) हा संघर्ष करणारा पक्ष आहे, जास्तीत जास्त काय होईल, सत्ता जाईल. ती परतही येईल, असं काही वेळापूर्वीच संकेत देणारे शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारं ट्विट केलं आहे. (Maharashtra Political Crisis in Marathi)

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेने सुरू आहे, असं त्यांनी ट्विटमध्ये नमूद केलं आहे. त्यामुळे राज्याची वाटचाल राष्ट्रपती राजवटीकडे सुरू असल्याचे हे संकेत असल्याचं बोलले जात आहे. कालपासून राज्य सरकारला अनेक धक्के बसत आहेत. दरम्यान, आज सकाळी १० पर्यंत सरकारला कोणताही धोका नाही. असं म्हणणारे संजय राऊत यांनीच आता आपल्या ट्विटरद्वारे सरकार बरखास्त होणार असल्याचे संकेत दिले आहेत. (Sanjay Raut News)

त्यामुळे सरकार स्थापनेपासून ते बरखास्त करण्यापर्यंतची वेळ शिवसेनेवर आली आहे. त्याला काऱण म्हणजे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी फोडलेले शिवसेनेचे आमदार हे असून आता जर शिंदे यांच्या आमदारांनी पाठिंबा काढून घेतला सरकार अल्पमतात येऊ शकतं. त्यामुळे मुख्यमंत्रीपदावर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) असताना जर सरकार पडलं. तर सेनेची नामुष्की झाली असती. त्यामुळे आता सरकार बरखास्त करण्याचा मध्यम मार्ग राऊत यांनी निवडला असल्याचं बोललं जातं आहे.

दरम्यान, शिवसेना संघर्ष करणारा पक्ष असून सत्ता जाईल बाकी काय होणार? असा सवाल करत सत्ता गेली तरी ती पुन्हा मिळवता येईन असं संजय राऊत म्हणाले होते. त्यानंतर त्यांनी आता सरकार बरखास्तीच्या दिशेने असल्याचं ट्विट केलं आहे. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट (Presidential reign) लागू शकते असं राजकीय विश्लेशक सांगत आहे.

हे देखील पाहा -

महाराष्ट्राची वाटचाल राष्ट्रपती राजवटीची कडे सुरु झाली असून अवघ्या अडीच वर्षात महाविकास आघाडीचा डाव फसला आहे. शिवसेनेची मागणी होती अडीच वर्ष मुख्यमंत्री पदावर उद्धव ठाकरे अडीच वर्ष मुख्यमंत्री असतील आणि त्यामुळे आता आपला कार्यकाळ पुर्ण झाल्याची भावना देखील एकीकडे बोलली जात असल्याचं समजत आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Team India Squad: टी-२० वर्ल्डकपसाठी दिग्गज खेळाडूकडून टीम इंडियाची घोषणा; या स्टार खेळाडूंना दाखवला बाहेरचा रस्ता

Honeymoon Destination : उन्हाळ्यात पार्टनरसोबत फिरण्यासाठी ही ठिकाणे आहेत बेस्ट!

Today's Marathi News Live : पीएम मोदींनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांची पुण्यात होणार जाहीर सभा

Vastu Tips: कारमध्ये ठेवा या वस्तू, Negativity होईल दूर

Supriya Sule On Dynasticism | होय आम्ही घराणेशाहीतून आलो, सुळे यांची कबुली

SCROLL FOR NEXT