Short Circuit in Hospital ICU Saam TV
मुंबई/पुणे

Vikhroli: रुग्णालयातील ICU मध्ये मोठा शॉर्ट सर्किट; विक्रोळीतील महात्मा फुले रुग्णालयातील घटना

Short Circuit in Hospital ICU: शॉर्टसर्किट झाल्याने आसीयूमध्ये सर्वत्र धूर पसरला होता. रुग्णांना याचा त्रास होऊ लागला होता आणि रात्री रुग्णालयात भीतीचं वातावरण पसरलं होतं.

Ruchika Jadhav

मयूर राणे

Mahatma Phule Hospital Vikhroli:

विक्रोळीतील महात्मा फुले रुग्णालयातील ICU मध्ये मोठा शॉर्ट सर्किट झाला आहे. यामुळे येथील रुग्णांना तात्काळ घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयात हलवण्यात आलंय. या घटनेमुळे रुग्णांच्या नातेवाईकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, विक्रोळी पूर्व टागोर नगर येथे असलेल्या क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालयातील ICU मध्ये रात्री दोनच्या सुमारास शॉर्ट सर्किट झाला. शॉर्ट सर्किट झाल्याने आसीयूमध्ये सर्वत्र धूर पसरला होता. रुग्णांना याचा त्रास होऊ लागला होता आणि रात्री रुग्णालयात भीतीचं वातावरण पसरलं होतं.

घटनास्थळी अग्निशमन दलाचे कर्मचारी पोहचले आणि धूरावर यावर नियंत्रण मिळवले आहे. मात्र सध्या ICU मधील रुग्ण हे घाटकोपर येथील राजावाडी रुगणालयात हलवण्यात आले आहेत. तर प्रकृती स्थीर असलेल्या काही रुग्णांवर रुग्णालयातील जनरल वार्डमध्ये उपचार सुरू आहेत. क्रांतिवीर महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालयातील सध्या ICU बंद करण्यात आले आहेत.

सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच डॉक्टरांनी आणि उपस्थित स्टाफने सर्व रुग्णांना सुरक्षितपणे तेथून बाहेर काढले. तसेच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थीवर नियंत्रण मिळवले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Electric Shock : मोटार सुरु करताना विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू; माहेरच्यांचा मात्र घातपाताचा आरोप

Maharashtra Live News Update : रत्नागिरी - मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक 15 तासानंतर सुरू

Oli Bhel Recipe: चौपाटीवर मिळणारी चटपटीत ओली भेळ, वाचा सीक्रेट रेसिपी

Mangal ketu Yuti: मंगळ-केतूची अशुभ युती अखेर संपली; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन!

Scenic Train Journey: भारताच्या या ८ रेल्वेतून प्रवास करा अन् स्वर्गसुखाचा आनंद लुटा

SCROLL FOR NEXT