विशाखापट्ट्णममधील एका रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये गुरुवारी भीषण आग लागल्यामुळे एकच खळबळ उडाली. तिसऱ्या मजल्यापर्यंत आग पसरली होती. रुग्ण आणि कर्मचाऱ्यांना शिड्या लावून हॉस्पिटलमधून बाहेर काढण्यात आलं आहे. दरम्यान कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि आग आटोक्यात आणली.
विशाखापट्ट्णमचे पोलीस आयुक्त ए. रविशंकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ११ च्या सुमारास विशाखापट्टणम येथील जगदंबा जंक्शन येथील इंड्स हॉस्पिटलमध्ये आग लागली. आग हॉस्पिटलच्या ऑपरेशन थिएटरमध्ये लागली होती. त्यानंतर आगीन रौद्र रूप धारण केले. त्यामुळे आग तिसऱ्या मदल्यापर्यंत पोहोचली. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये एकच गोंधळ माजला. रुग्ण नातेवाईक आणि कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. आग इतकी भयंकर होती की. दूरवरून आगीचे लोळ दिसत होते.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
दरम्यान आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी शिड्या लावून रुग्णांना हॉस्पिटलच्या वरच्या मजल्यावरू बाहेर काढले. ५७ कर्मचारी आणि डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आल्याची माहिती आयुक्तानी दिली. दरम्यान या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, सर्वजण सुरक्षित आहेत. मात्र आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती अद्याप मिळालेली नाही. पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.