Shri Krishna Janmabhoomi Case: श्रीकृष्ण जन्मभूमीबाबत मोठा निर्णय, शाही ईदगाह मशिदीच्या ASI सर्वेक्षणाला मंजुरी

Allahabad High Court On Krishna Janmbhoomi and Mathura's Shashi Idgah: श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरणातील अलाहाबाद हायकोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. न्यायालयाने शाही ईदगाह मशिदीच्या एएसआय सर्वेक्षणाला मंजुरी दिली आहे.
Allahabad High Court on Krishna Janmbhoomi Land Dispute Case
Allahabad High Court on Krishna Janmbhoomi Land Dispute CaseSaam Digital
Published On

Allahabad High Court On Shree Krishna Janmbhoomi

श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरणातील अलाहाबाद हायकोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. न्यायालयाने शाही ईदगाह मशिदीच्या एएसआय सर्वेक्षणाला मंजुरी दिली आहे. मथुरेतील श्री कृष्ण जन्मभूमी आणि ईदगाह मशिदीच्या प्रकरणात वादग्रस्त जागेसंदर्भातील सर्वेक्षण वकील आयुक्तांमार्फत करण्याची याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्याला आज मंजुरी देण्यात आली आहे. न्यायाधीश मयंक कुमार जैन यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.

Allahabad High Court on Krishna Janmbhoomi Land Dispute Case
Shri Krishna Janmashtami 2023 : बडा नटखट है रे कृष्ण कन्हैया...श्री कृष्ण जन्माष्टमीला भेट द्या द्वारकानगरीला, कसे जाल?

यावर १८ डिसेंबरला कोर्ट आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करावी आणि पढील कारवाई कशी असेल यासंदर्भात न्यायालय निर्णय घेणार आहे. सर्व प्रथम हिंदू पक्षाने ही मागणी मथुरा न्यायालयात मांडली होती. डिसेंबर २०२२ मध्ये मथुरा न्यायालयाने सर्वेक्षणाला मंजुरी दिली होती. मात्र मुस्लिम पक्षाने उच्च न्यायालयात धाव घेतल्यामुळे सर्वेक्षणाला स्थगिती देण्यात आली होती. मात्र आता उच्च न्यायालयाने सर्वेक्षणाला मंजुरी दिली आहे. मुस्लिम पक्ष आता सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Allahabad High Court on Krishna Janmbhoomi Land Dispute Case
Loksabha MP's suspended: मोठी बातमी! लोकसभेतून १५ खासदारांचे निलंबन; कारण काय?

श्री कृष्ण जन्मभूमी वादातील काही प्रमुख मुद्दे

हिंदू पक्षाने १३.३७ एकर जमिनीच्या मालकीची मागणी करणारी याचिका मुथरा न्यायालयात दाखल केली होती. डिसेंबर २०२० मध्ये न्यायालयाने सर्वेक्षणाचे आदेश दिले होते. त्याला मुस्लिम पक्षाने उच्च न्यायालयात आव्हान दिले.

मंदिर पाडून १७ व्या शतकात मशीद बाधण्यात आल्याचा दावा हिंदू पक्षाने केला होता. काही पुरावेही दाखल केले होते.

श्री कृष्ण जन्मस्थान सेवा संस्थान आणि शाही मशीद इदगाह ट्रस्ट याच्यात १९६८ मध्ये एक करार झाला होता. ज्यात १३.३७ एकर जमिनीपैकी १०.९ एकर जमीन कृष्ण जन्मभूमीला आणि २.५ एकर जमीन मशिदीली देण्यात आली.

या वादाग्रस्त जागेसंदर्भात एकून १८ खटले असून उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

१७ व्या शतकात औरंगजेबाने ही मशीद बांधली होती. १९९१ च्या प्रार्थनास्थळ कायद्याचा हवाला देत मुस्लिम पक्ष हा दावा चुकीचा असल्याचे म्हणत आला आहे.

Allahabad High Court on Krishna Janmbhoomi Land Dispute Case
Amol Shinde Parents Cries : लेकरू गेलाय तो...आईबाबांच्या तोंडून शब्दच फुटत नाहीत, अमोल शिंदेचं नुसतं नाव काढलं तरी धाय मोकलून रडताहेत, VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com