Loksabha MP's suspended: मोठी बातमी! लोकसभेतून १५ खासदारांचे निलंबन; कारण काय?

15 Opposition MPs suspended: लोकसभेच्या कामकाजादरम्यान गदारोळ आणि गैरवर्तवणूक केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
15 Opposition MPs suspended
15 Opposition MPs suspendedSaamtv
Published On

प्रमोद जगताप, दिल्ली|ता. १४ डिसेंबर २०२३

Parliament Winter Session 2023:

सभागृहातील कामकाजात अडथळा आणल्याचा ठपका ठेवत लोकसभेतील विरोधकांच्या १५ खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. लोकसभेच्या कामकाजादरम्यान गदारोळ आणि गैरवर्तवणूक केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या १५ खासदारांपैकी ५ खासदार हे कॉंग्रेसचे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, संसदेची सुरक्षा भेदल्याची घटना घडल्यानंतर देशभरात खळबळ उडाली आहे. लोकसभेत खासदार बसलेल्या बाकांवर या तरुणांनी उड्या मारून धुराच्या नळकांड्या फोडल्या. या घटनेनंतर संसदेच्या सुरक्षितेवर प्रश्न चिन्ह उपस्थित करत विरोधकांनी सभागृहात विरोधकांनी मोठा गोंधळही केल्याचे पाहायला मिळाले होते.

काल झालेल्या या घटनेवर गंभीर दखल घेत विरोधकांच्या १५ खासदारांचे निलंबन केले आहे. सभापतींनी गोंधळ घालणाऱ्या खासदारांची नावं दिल्यानतंर 15 विरोधी खासदारांना अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कोण आहेत १५ खासदार?

या १५ मध्ये लोकसभेच्या टीएन प्रथापन, हीबी एडेन, जोथिमनी, राम्या हरिदास , डीन कुरियाकोस, बेनी बेहानान, वीके श्रीधरन, मोहम्मद जावेद, पीआर नटराजन, कनिमोई करुणानिधि, के सुब्रमण्यन, एसआर पारथीबान, एस वेंकटेशन , मणिकम टैगोर या खासदारांचा समावेश आहे. तर राज्यसभेतून डेरेक ऑब्रायान यांना निलंबित करण्यात आले आहे. (Latest Marathi News)

15 Opposition MPs suspended
Amol Shinde Parents Cries : लेकरू गेलाय तो...आईबाबांच्या तोंडून शब्दच फुटत नाहीत, अमोल शिंदेचं नुसतं नाव काढलं तरी धाय मोकलून रडताहेत, VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com