Maharashtra Today Weather News Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Weather : राज्यावर अवकाळीचे संकट कायम, पुढचे ४८ तास महत्वाचे; कोणत्या जिल्ह्यांना झोडपून काढणार?

Maharashtra Today Weather News : महाराष्ट्रात उष्णतेचा कडाका वाढला असून तापमान ४० अंशांच्या पुढे गेले आहे. हवामान विभागाने काही जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे. संपूर्ण अपडेट वाचा.

Alisha Khedekar

  • महाराष्ट्रात तापमान ४० अंशांच्या पुढे गेले

  • काही जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

  • विदर्भात उष्णतेची लाट कायम

  • पुढील काही दिवस तापमानात थोडी घट होण्याची शक्यता

  • नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात उष्णतेचा कडाका वाढत असून तापमानाने ४० अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. उन्हाच्या तीव्रतेमुळे दैनंदिन जीवनावर परिणाम होत असून दुपारच्या वेळी रस्ते ओस पडलेले दिसत आहेत. दुसरीकडे, राज्यातील काही भागांमध्ये मात्र विजांच्या कडकडाटासह वादळी वारे, पाऊस आणि गारपीट होत असल्याचे चित्र आहे. या बदलत्या हवामानामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी ४० ते ५० किमी वेगाने वाहणारे सोसाट्याचे वारे यांचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी रिमझिम पाऊस तर काही भागांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे यलो अलर्ट देण्यात आला असून पुढील ४८ तास महत्त्वाचे आहेत. विशेषतः घाट परिसरात हवामान अधिक बदलते राहण्याची शक्यता असल्याने पर्यटकांनीही काळजी घेणे आवश्यक आहे.

दरम्यान, विदर्भातील अकोला, अमरावती, चंद्रपूर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज आहे. या भागात तापमान आणखी वाढण्याची शक्यता असून नागरिकांना उष्माघाताचा धोका आहे. तर ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी या किनारी भागांमध्ये उष्ण आणि दमट हवामान कायम राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

पुढील २४ तासांत कमाल तापमानात मोठा बदल अपेक्षित नसून त्यानंतर तापमानात २ ते ४ अंशांनी घट होण्याची शक्यता आहे. राज्याच्या अंतर्गत भागात तापमान ४१ ते ४३अंश सेल्सिअसदरम्यान राहू शकते. किमान तापमानातही पुढील ४ ते ५ दिवसांत विशेष बदल होणार नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, तज्ज्ञांनी नागरिकांना उष्णतेपासून बचावासाठी दुपारी घराबाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी पिण्याचा सल्ला दिला आहे. बदलत्या हवामानामुळे आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Okra Water Benefits: सलग ६ महिने भेंडीचे पाणी प्या, आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल

Maharashtra News Live Update: बँकेची निवडणूक स्वबळावर लढणार – जयकुमार गोरे

Chinchpokli Travel : विकेंड प्लान अजून झाला नाही? मुलांसोबत चिंचपोकळीजवळील 'या' ५ ठिकाणांची करा सफर

रोज फक्त फळे खाल्ली तर शरीरावर काय परिणाम होतो? जाणून घ्या

Momo Recipe: संध्याकाळच्या नाश्त्यासाठी झटपट घरच्या घरी बनवा गरमागरम आणि चटपटीत मोमोज; वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT