Maharashtra Rain Alert Saam TV
मुंबई/पुणे

Weather Alert : मुंबई, कोकणासह विदर्भातील १८ जिल्ह्यांत आज तुफान पावसाचा इशारा; हवामान खात्याकडून अलर्ट जारी

Maharashtra Rain Alert : मुंबईसह कोकण आणि विदर्भातील १८ जिल्ह्यांत मात्र पावसाचा जोर कायम राहणार आहे. पुढील पाच दिवस या भागात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Satish Daud

मान्सूनने परतीचा प्रवास सुरु केल्यानंतर गेल्या चार ते पाच दिवसांपासून राज्यात जोरदार सुरु आहे. पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे पावसाचा जोर नेमका कधी कमी होणार? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. दरम्यान, हवामान खात्याने परतीच्या पावसाबाबत एक मोठी अपडेट दिली आहे. आज रविवार २९ सप्टेंबरपासून पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.

आयएमडीने जारी केलेल्या अंदाजानुसार, रविवारपासून पुढील आठवडाभर ५ ऑक्टोबरपर्यंत राज्यात सर्वत्र ढगाळ वातावरण राहणार आहे. खान्देश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि मराठवाड्यातील काही भागात हलका ते मध्यम पाऊस होईल. १८ जिल्ह्यात केवळ ढगाळ वातावरण राहून हळूहळू पावसाचा जोर काहीसा कमी होईल.

केवळ अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईसह कोकण आणि विदर्भातील १८ जिल्ह्यांत मात्र पावसाचा जोर कायम राहणार आहे. पुढील पाच दिवस या भागात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. १ ऑक्टोबरनंतर पाऊस उघडीप देईल, असं सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, मुंबई शहरासह उपनगर, कोकणातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अशा ७ जिल्ह्यात तर मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर अशा ६ जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जोरदार पाऊस झाल्याने १३ जिल्ह्यातील तापी, गोदावरी आणि कृष्णा नद्यांच्या खोऱ्यात मात्र पूरपाण्याची तीव्रता वाढू शकते.

दरम्यान, राज्यात ६ ऑक्टोबर नंतर पुन्हा पावसाची सक्रियता वाढून १३ ऑक्टोबर पर्यन्त म्हणजे आठवडाभर मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यानंतर म्हणजे १६ तारखेनंतर मान्सून केंव्हाही निरोप घेऊ शकतो. अर्थात मान्सून निघून गेला तरी चक्रीवादळाचा सीझन चालू होत असल्यामुळे महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाकारता येत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: एकनाथ शिंदे यांच्या जय गुजरात घोषणेवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना ट्विट करत धमकी देणारे सुशील केडिया कोण आहेत?

उपवासात मिळवा चव आणि पोषण यांचा मेळ; बनवा ही खास इडली

Dharashiv : आदिवासी समाजावर ग्रामपंचायतीचा सामाजिक बहिष्कार; सरपंच व ग्रामसेवकावर कारवाईची मागणी

MNS Warns Sushil Kedia : ५ तारखेनंतर काय करायचं ते करू; राज ठाकरेंना धमकी देणाऱ्या केडियांना मनसेचं ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT