Maharashtra Weather Update Saam Tv News
मुंबई/पुणे

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी, IMDची मोठी माहिती! सतर्क राहण्याचं आवाहन

Maharashtra Weather Update : पुढील २४ तासांकरता या पाच जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. राज्यात मागील २४ तासांमध्ये मुंबई उपनगर जिल्ह्यात ८३.४ मिमी पावसाची सर्वाधिक नोंद झाली आहे.

Prashant Patil

पुणे : महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. आज अनेक ठिकाणी पावसाने काही प्रमाणात विश्रांती घेतली असली, तरी राज्यातील काही भागांत पाऊस सुरुच आहे. या हवामानाबाबत, भारतीय हवामान विभागाने पुढील २४ तासांसाठी रत्नागिरी, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. त्यामुळे, या भागांतील नागरिकांनी सतर्क राहावं, असा आवाहन देखील हवामान विभागानं दिला आहे.

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील २४ तासांकरता या पाच जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. राज्यात मागील २४ तासांमध्ये मुंबई उपनगर जिल्ह्यात ८३.४ मिमी पावसाची सर्वाधिक नोंद झाली आहे. त्याखालोखाल ठाणे जिल्ह्यात ७३.७ मिमी, मुंबई शहर ६२.९ मिमी, रायगड ५४.१ मिमी आणि पालघर जिल्ह्यात ४९.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

राज्यात कालपासून तर आज सकाळपर्यंत झालेल्या पावसाची सरासरी आकडेवारी पुढीलप्रमाणे

ठाणे ७३.७, रायगड ५४.१, रत्नागिरी ४७.७, सिंधुदुर्ग १२.७, पालघर ४९.७, नाशिक ७.७, धुळे ७.१, नंदुरबार ४, जळगाव ६.७, अहिल्यानगर १.१, पुणे ११.९, सोलापूर ०.९, सातारा १९.७, सांगली ६, कोल्हापूर १७.८, छत्रपती संभाजीनगर ०.६, जालना ०.१, बीड ०.७, लातूर ०.१, धाराशिव १.६, नांदेड ३.६, परभणी १.७, हिंगोली ३.६, बुलढाणा ३.५, अकोला ८.७, वाशिम ८.५, अमरावती ९.४, यवतमाळ ८.७, वर्धा ७.६, नागपूर ०.९, गोंदिया ०.२, चंद्रपूर ११.९ आणि गडचिरोली जिल्ह्यात ५.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

जगबुडी नदी इशारा पातळीवर, वाहतूक विस्कळीत

रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदी इशारा पातळीवर वाहत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनामार्फत नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रत्नागिरी येथे मुंबई-गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील वळंजवडी येथे महामार्गावर १०० मीटर परिसरात भेगा पडल्याने या महामार्गावरील वाहतूक सध्या एकेरी मार्गावरून सुरू आहे, ज्यामुळे वाहतुकीची गती मंदावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मध्य रेल्वेच्या १० स्थानकांवर लवकरच मिळणार आपत्कालीन मेडिकल सुविधा

Maharashtra Live News Update: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टिळक भवन येथे वरिष्ठ नेते, जिल्हाध्यक्ष व संघटन सृजन अभियानाचे समन्वयक यांची बैठक सुरु

Maharashtra Politics: मोठी बातमी! मंत्रिमंडळात फेरबदल होणार? २ बड्या नेत्यांवर एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा

Viral Video: बॉयफ्रेंडशी लग्न लावून द्या नाहीतर...! प्रेमासाठी तरूणी चढली टॉवरवर, व्हिडीओ व्हायरल

Constipation: सकाळी पोट साफ होत नाही? मग रात्रीच्या खाण्यात करा हा बदल; 1 मिनिटांत पोट होईल साफ

SCROLL FOR NEXT