Unseasonal Rain Forecast Maharashtra April 18 saam tv
मुंबई/पुणे

कडाक्याच्या उन्हाळ्यात अवकाळीचा तडाखा; राज्यात तीन दिवस पावसाचा इशारा

Unseasonal Rain Forecast Maharashtra April 18: महाराष्ट्रात पुढील तीन दिवस उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता असून तापमान ४५ अंशांच्या पुढे जाणार आहे.

Omkar Sonawane

सागर आव्हाड, साम टीव्ही

पुणे: राज्याच्या बहुतांश भागात भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला असताना, पुण्यातही गेल्या दोन दिवसांत तापमानाचा पारा ४० अंशांजवळ रेंगाळला आहे, तर उपनगरात तापमान ४१ अंशांच्या पुढे पोहोचले आहे. महाराष्ट्रावर असलेली प्रत्यावर्ती चक्रीय वातस्थिती आणि पूर्वेकडून येणारे वारे यांमुळे कोकणामध्ये उष्ण आणि दमट वातावरणस्थिती निर्माण झाली आहे. आज आणि उद्या कोकणात ही स्थिती कायम राहू शकते; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

अकोल्यात पारा ४४ अंशांवर

राज्यात सर्वाधिक कमाल तापमान अकोला येथे ४४ अंश सेल्सिअस नोंदले गेले. अमरावती येथे ४३.८, बुलडाणा येथे ४१.६, चंद्रपूर येथे ४२.२, गोंदिया येथे ४१.१, नागपूर येथे ४२.२, वाशिम येथे ४२.४, वर्धा येथे ४३.५; तर यवतमाळ येथे ४२.६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.

रस्त्यावरील विक्रेते, बांधकाम मजूर, वाहतूक पोलिस, स्वच्छता कर्मचारी, डिलिव्हरी कामगार, रिक्षाचालक आदी बाहेर काम करणाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले आहे. भारतीय हवामान विभागाच्या येलो, अल्ट्रा ऑरेंज आणि रेड ॲलर्टनुसार कामाचे वेळापत्रक बदलणे, पाण्यासाठी विश्रांती, पाण्याचे बूथ, ओआरएस वितरण, सावलीची व्यवस्था आणि आरोग्य सुविधा मजबूत करणे यांसारख्या उपाययोजनांचा यात समावेश करण्यात याला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Tourism: लोणावळा-खंडाळा विसरा! धुळ्याजवळच्या 'या' थंड हवेच्या ठिकाणी नक्की फिरून या

Maharashtra News Live Update: सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

Benefits of Cinnamon Tea: वजन कमी करण्यासाठी रोज सकाळी उठल्यावर प्या ही खास चहा, मिळतील हे आरोग्यदायी फायदे

कीर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात चोरट्यांचा डल्ला; 2 लाख 90 हजारांचा मुद्देमाल लंपास

Constipation relief tips: सकाळी उठताच पाणी प्यायल्यास खरोखरच पोट साफ होतं का?

SCROLL FOR NEXT