Maharashtra Today Teamprature Saam Tv
मुंबई/पुणे

Weather Update : मुंबईसह राज्यात तापमानाचा पारा घसरला, पावसाप्रमाणे थंडीचाही मुक्काम वाढणार; आज कुठे कसं हवामान?

Maharashtra Today Teamprature : राज्यात किमान तापमानात सतत चढ-उतार होत असून अनेक जिल्ह्यांत पारा १० अंशांच्या खाली आहे. पावसाप्रमाणे थंडीसुद्धा लांबणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Alisha Khedekar

  • राज्यात किमान तापमानात चढ-उतार सुरू असून थंडी कमी-अधिक जाणवत आहे

  • परभणी 6.8°C, धुळे 7°C, निफाड 7.6°C, अहिल्यानगर 7.5°C सह पारा १०°C खाली

  • उत्तरेकडील बर्फवृष्टीमुळे जानेवारीत थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता

  • पहाटे धुके-दव आणि रात्री ८ नंतर बाजारपेठांत शुकशुकाट पाहायला मिळत आहे

राज्यात किमान तापमानात सतत चढ उतार होत असल्याने राज्यात थंडी कमी -अधिक होत आहे. अनेक ठिकाणी अद्यापही पारा १० अंशांच्या खाली असल्याने थंडीचा कडाका अनुभवायला मिळत आहे. आज देखील किमान तापमानात चढ-उतार होत असून गारठा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

काल म्हणजेच रविवारी परभणीत ६.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. धुळ्यात ७ अंश सेल्सिअस, अहिल्यानगर येथे ७.५ अंश सेल्सिअस, निफाड येथे ७.६ अंश सेल्सिअस, परभणी येथे ७.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. गोंदिया येथे ९ अंश, तर भंडारा आणि ‎नागपूर येथे १० अंशांपेक्षा कमी तापमानाची नोंद झाली.

यंदा हिवाळा लांबणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहे उत्तरेकडील राज्यात बर्फवृष्टी सुरू असल्याने थंड वारे दक्षिणेकडे वाहू लागले आहे त्यामुळे जानेवारी महिन्यात थंडीचा कडाका वाढणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत असून यवतमाळ जिल्ह्यात थंडीचा जोर कायम असून १०.४ अंश तापमानाची नोंद झाली आहे. थंडीचा जोर असल्याने दिवसभर उबदार कपडे घालून घराबाहेर पडावे लागत आहे.रात्री आठ नंतर गारठा वाढत असल्याने ग्रामीण शहरातील बाजारपेठेतील शुकशुकाट पाहायला मिळत आहे.

राज्यात काल निफाड, धुळे, अहिल्यानगर, परभणी येथे थंडीचा कडाका टिकून होता. पहाटेच्या वेळी धुके आणि दव पडल्याचे दिसून आले. उर्वरित राज्याच्या किमान तापमानातील वाढ कायम असली तरी गारठा कायम होता. आज राज्यातील कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार कायम राहणार असून, थंडी टिकून राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Election: आधी स्वबळाची घोषणा, ऐनवेळी वंचितशी युती; BMCसाठी काँग्रेसला का हवी आंबेडकरांची साथ,नवी आघाडीची रणनीती काय?

Maharashtra Live News Update: मनसेच्या उमेदवारांची यादी आजही जाहीर होणार नाही?

Ajit Pawar : पाप कुठे फेडणार..., अजित पवारांचा रोख नेमका कुणाकडे?

BMC Election: मोठी बातमी! ठाकरेसेनेकडून ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कुणाली दिली संधी?

Rupali Bhosle Mangalsutra Designs: अभिनेत्री रूपाली भोसलेच्या मंगळसूत्राची महिलांमध्ये क्रेझ, या 5 डिझाईन्स तुम्हीही नक्की ट्राय करा

SCROLL FOR NEXT