Mumbai Rain Update Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra 23 July Rain Updates: राज्यात आज पावसाचा जोर कायम, मुंबईसह 4 जिल्ह्यांना ऑरेंज, पालघरला रेड अलर्ट जारी

Mumbai Rain Live Updates: रविवारीही पावसाचा जोर राहणार कायम, मुंबईसह 4 जिल्ह्यांना ऑरेंज, तर पालघरला रेड अलर्ट जारी

Satish Kengar

Maharashtra 23 July Rain Updates: भारतीय हवामान विभागाने (IMD) पालघर जिल्ह्यात शनिवारी मुसळधार ते अति मुसळधार पावसासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

शुक्रवारी मुंबई आणि महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली/ ज्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचले आणि शहर आणि उपनगरात वाहनांची वाहतूक विस्कळीत झाली. कुर्ला, अंधेरी, घाटकोपर, चेंबूर आदी ठिकाणी पाणी साचले होते.

जोरदार पावसामुळे मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्टने (BEST) दुपारी मुंबईच्या सायन भागातील 12 हून अधिक मार्गांवर बसेस वळवल्या. यातच पाणी साचल्याने अंधेरी भुयारी मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने वाहनचालक आणि पादचाऱ्यांची प्रचंड गैरसोय झाली.  (Rain News)

शनिवारी पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावरील रेल्वेवरही वापसचा परिणाम दिसून आला आहे. अति मुसळधार पावसामुळे रेल्वे 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत होती. मुंबई हवामान विभागाच्या अहवालानुसार, शहर आणि उपनगरातील अनेक भागात सकाळी 8 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 100 मिमी पेक्षा जास्त पाऊस झाला. सर्वाधिक 130 मिमी पावसाची नोंद घाटकोपर येथे झाली, त्यानंतर वांद्रे पश्चिम येथे 124 मिमी आणि कुर्ला येथे 116 मिमी पावसाची नोंद झाली. (Maharashtra News)

दरम्यान, भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, "कोकण आणि गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील घाट भागात 23 ते 26 जुलै, सौराष्ट्र आणि कच्छ 24 जुलै आणि गुजरात प्रदेशात 23 जुलै रोजी जोरदार पावसाची शक्यता आहे. मुंबईतही पुढील दोन दिवसांत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडू शकतो."  (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amdar Niwas Canteen : मोठी बातमी! आमदार निवासातील कॅन्टीनचा परवाना रद्द; अन्न व औषध प्रशासन विभागाकडून कारवाई

Dancing Car : आता काय म्हणावं? दोघांचा ताबा सुटला, दिवसाढवळ्या कारमध्येच जोडप्याचा रोमान्स, एकमेकांचे कपडे काढले अन्..., व्हिडिओ व्हायरल

गुंठाभर जमिनीचा ७/१२ सहज मिळणार, तुकडाबंदी कायदा रद्द करणार; सरकारची विधानसभेत घोषणा

पर्यटनासाठी लागणार तिकीट, धबधब्यावर जायचंय तर खटाखट पैसे मोजा; प्रशासनाचा निर्णय काय?

Ladki Bahin Yojana : नव्या लाडकींना लाभ मिळणार का? पोर्टल कधी सुरू होणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT