Maharashtra FDA News AI Image
मुंबई/पुणे

Maharashtra : महाराष्ट्रात FDA ची धडक कारवाई; ७८.४९ कोटींचे अन्नपदार्थ जप्त

Maharashtra FDA News : महाराष्ट्रात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई! सप्टेंबर २०२६ अखेरपर्यंत ७८.४९ कोटींचे अन्नपदार्थ जप्त.अन्नभेसळीची तक्रार कुठे कराल? जाणून घ्या सविस्तर.

Alisha Khedekar

महाराष्ट्रात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) सप्टेंबर २०२६ अखेरपर्यंत राज्यभरात व्यापक कारवाई केली आहे. या कारवाईत प्रतिबंधित, संशयित, निकृष्ट आणि भेसळयुक्त अन्नपदार्थांचा एकूण ७८.४९ कोटी रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी तुकाराम मुंढे यांनी या कारवाईची माहिती दिली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर दंडात्मक कारवाई करत अनेक परवाने निलंबित आणि रद्द करण्यात आले आहेत.

राज्यभरात एकूण १९,७१३ अन्न आस्थापनांची तपासणी करण्यात आली. नियमभंग आढळलेल्या ८९२ आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले, तर १,५३८ आस्थापनांना व्यवसाय बंद करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या. गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखू यांसारख्या प्रतिबंधित पदार्थांच्या विक्री व वाहतुकीविरोधात प्रशासनाने विशेष मोहीम राबवली. या मोहिमेत २७.८६ कोटी रुपयांचा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. या पदार्थांच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली १३.६१ कोटी रुपये किमतीची २०५ वाहनेही जप्त करण्यात आली. संबंधित प्रकरणांत १,१७५ एफआयआर दाखल करण्यात आले असून, १,५२९ जणांना अटक करण्यात आली आहे.

याशिवाय, इतर संशयित, निकृष्ट आणि भेसळयुक्त अन्नपदार्थांचा ५०.६३ कोटी रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या तपासणीत २,०३,६२२ लिटर दूध जप्त करण्यात आले. या प्रकरणांत १९ एफआयआर दाखल करून ६५ जणांना अटक करण्यात आली. अॅनालॉग पनीरच्या प्रकरणात सर्व १६ परवाने रद्द करण्यात आले असून, २२,२४१ किलो पनीरचा साठा जप्त करण्यात आला. खाद्यतेलाच्या कारवाईत ५,८८५.८८ क्विंटल तेल जप्त करण्यात आले. हॉटेल, रेस्टॉरंट आणि धाब्यांच्या तपासणीतही नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये ५८५ परवाने निलंबित, तर १५ परवाने रद्द करण्यात आले.

शालेय विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्नाचे महत्त्व समजावे, यासाठी राबविण्यात आलेल्या उपक्रमात ६२,४८४ शाळा आणि ७०,५५४ शिक्षक सहभागी झाले. दरम्यान, राज्यात अन्नविषबाधेच्या १२ घटनांची नोंद झाली असून, त्यात ५४३ व्यक्ती बाधित झाल्या आहेत. अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत किंवा भेसळीबाबत तक्रार असल्यास नागरिकांनी अन्न व औषध प्रशासनाच्या १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या दोन लेकींची मोठी झेप! क्रिकेट संघात मिळाली संधी

Upvasachi Lassi Recipe : नवरात्री स्पेशल! अवघ्या ५ मिनिटांत बनवा थंडगार मलाईदार लस्सी

Maharashtra News Live Update: रूक्मिणी मातेस पारंपारिक वनदेवी मातेचा पोषाख परिधान

आता सुटे मसाले विकता येणार नाहीत? तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय; दुकानदारांचं टेन्शन वाढलं!

Pune : मोठी बातमी! रॅपिडो बाइक - टॅक्सी सेवा बंद करण्याचे आदेश; वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT