Thane News  Saam Tv
मुंबई/पुणे

Thane Fraud : शहापूरमध्ये मोफत शिबिरात आदिवासी महिलांकडून ३ हजारांची वसूली, डॉक्टर घटनास्थळावरून गायब

Thane Shahapur News : ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात कुटुंब नियोजन शिबिरात आदिवासी महिलांकडून प्रत्येकी ३ हजारांची वसूली केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Alisha Khedekar

  • शहापूर तालुक्यातील कुटुंब नियोजन शिबिरात आदिवासी महिलांकडून ३ हजारांची वसूली.

  • ५२ महिला शस्त्रक्रियेसाठी आल्या असून मोफत शिबिर असूनही पैसे घेतले गेले.

  • नागरिकांनी आरोग्य विभागाला जाब विचारला, डॉक्टर मात्र घटनास्थळावरून निघून गेले.

  • चौकशी करून दोषींवर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील टेंभा प्राथमिक आरोग्य केंद्रा मार्फत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीने गोरगरीब व विशेषत: आदिवासी समाजातील महिलांसाठी मोफत राबवले जाते. मात्र या शिबिरात धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून शस्त्रक्रिया करून घेणाऱ्या महिलांकडून तब्बल तीन हजार रुपयांची वसूली करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, काल दिवसभर हे शिबिर खर्डी ग्रामीण रुग्णालयात घेण्यात आले होते. टेंभा प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत हे शिबिर आयोजित करण्यात आले होते, मात्र जागेअभावी ते खर्डी येथे हलविण्यात आले. शिबिरात एकूण ५२ महिला कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी आल्या होत्या. बहुतेक महिला आदिवासी पाड्यातून इथे पोहोचल्या होत्या. सरकारी नोंदीनुसार हे शिबिर पूर्णपणे मोफत आहे, परंतु प्रत्येक महिलेच्या शस्त्रक्रियेसाठी त्यांच्याकडून ३,००० रुपये घेण्यात आल्याची तक्रार करण्यात आली आहे.

हा प्रकार खर्डी गावचे रहिवासी सागर बागुल यांच्या लक्षात आला. त्यांनी लगेच याबाबत डॉक्टरांना जाब विचारला, मात्र तोपर्यंत शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर ठिकाणावरून निघून गेले होते. त्यामुळे पैशांची वसूली नेमकी कोणी केली, या मागे कोणते आरोग्य कर्मचारी सामील होते, याचा तपास करण्याची मागणी होत आहे.

गोरगरीब व आदिवासी महिलांकडून अशाप्रकारे मोठ्या प्रमाणात रक्कम वसूल करण्यात आल्याने संतापाची लाट उसळली आहे. अनेक महिला कुटुंब नियोजनासाठी या शिबिरात सहभागी झाल्या होत्या, कारण त्यांना सरकारी शिबिर मोफत असल्याची खात्री दिली होती. मात्र, प्रत्यक्षात पैसे मागण्यात आल्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाल्याचे मानले जात आहे.

कुटुंब नियोजन शिबिरे ही शासनाची महत्त्वाची योजना असून ग्रामीण भागातील, विशेषत: आदिवासी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील महिलांना आरोग्य सुविधा मोफत पुरविण्यासाठीच ही शिबिरे घेतली जातात. अशा वेळी शिबिराच्या नावाखाली पैशांची वसूली करणे हा गंभीर प्रकार ठरत आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

दरम्यान, हा प्रकार उघड झाल्यानंतर स्थानिक प्रशासन व आरोग्य विभागाकडे तक्रारींचा पाढा चालू झाला आहे. महिलांच्या आयुष्याशी थेट संबंधित असलेल्या अशा शस्त्रक्रियांसाठी पैसे आकारणे ही केवळ अनैतिक बाब नाही तर शासनाच्या आदेशाचा थेट भंग आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे या प्रकरणी सत्य बाहेर आणून जबाबदारांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NPCIL Recruitment: NPCIL मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; पगार ५६,१०० रुपये; अर्ज कसा करावा?

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंविरोधात कारवाई होणार?, कोरेगाव-भीमा दंगल प्रकरणी तिसऱ्यांदा नोटीस

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे यांना भीमा कोरेगाव आयोगाची कारणे दाखवा नोटीस

US Work Permit Rules : अमेरिकेच्या निर्णयाचा होणार परिणाम, भारतीयांच्या नोकरीवर टांगती तलवार? | VIDEO

डिजिटल होम अरेस्टच्या नावाखाली फसवलं, १ कोटी लुबाडले, पुण्यातील वृद्धाचा हृदयविकारानं मृत्यू

SCROLL FOR NEXT