फैय्याज शेख
शहापूर : मागील काही दिवसांपासून चांगला पाऊस होत आहे. शहापूर तालुक्यात आठवड्याभरा पासून पाऊस बरसत असून धरण क्षेत्रात देखील सततधार सुरू असल्याने गेल्या आठवड्यापासून तीनही धरण ओव्हरफ्लो झाले आहे. यामुळे आता मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. धरणांचे दरवाजे उघडण्यात आले असून धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग नदी पात्रात सुरू आहे.
मागील आठवड्यापासून राज्यात जोरदार पाऊस होत आहे. शहापूर तालुक्यात देखील चांगला पाऊस झाल्याने तालुक्यातील तीनही धरणातील पाणी साठ्यात वाढ झाली आहे. यात मध्य वैतरणा धरणाचे पाच दरवाजे उघडले असून यामधून ३ हजार ५३१ क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
नदीच्या पाण्याचा पातळीत वाढ
दुसरीकडे मोडक सागर धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे उघडले गेले असून यामधून ४ हजार ७५६ क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तर तिसरे तानसा धरणातून देखील पाण्याचा विसर्ग सुरू असून या धरणा मधून ६ हजार ६३१ क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीच्या पाण्याचा पातळीत कमालीची वाढ झाली आहे.
उजनी धरण ९७ टक्के भरले
उजनी आणि वीर धरणातून सोडलेल्या पाण्याने भीमा नदी पुन्हा एकदा दुथडी भरून वाहू लागली आहे. पंढरपूर मध्ये नदीच्या वाळवंटातील सर्व मंदिरांना पाण्याचा वेढा पडला आहे. उजनी धरण ९७ टक्के भरला असून सध्या ११५ टीएमसी पाणीसाठा उजनी धरणामध्ये झालेला आहे. त्यामुळे उजनी धरणातून ५० हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग भीमा नदीमध्ये प्रवाहित करण्यात आला आहे. तर वीर धरण सुद्धा ९० टक्के पेक्षा जास्त भरल्यामुळे वीर धरणातून २३ हजार पाण्याचा विसर्ग निरा नदीमध्ये सोडण्यात आलेला आहे. भीमा आणि नीरा नदीचा संगम माळशिरस तालुक्यात होतो. तिथून हे पाणी भीमा नदीतून पंढरपूर कडे येते. त्यामुळे भीमा नदीवर असणारे सर्व बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.