Trimbakeshwar Temple : त्र्यंबकेश्वरमध्ये व्हीआयपी दर्शन पास मध्ये छेडछाड; तारीख बदलवून दर्शनाला जाण्याचा प्रयत्न

Nashik News : गर्दीत तात्काळ दर्शन घेता यावे यासाठी मंदिर समितीने व्हीआयपी दर्शन पासची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र याच व्हीआयपी दर्शन पासमध्ये छेडछाड करून मंदिरात घुसण्याचा प्रयत्न
Trimbakeshwar Temple
Trimbakeshwar TempleSaam tv
Published On

त्र्यंबकेश्वर (नाशिक) : प्रथम श्रावणी सोमवार असल्याने ज्योतिर्लिंगासह महादेव मंदिरात भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी गर्दी करत आहेत. त्यानुसार त्र्यंबकेश्वर येथे देखील भाविकांची पहाटेपासून गर्दी आहे. मात्र याठिकाणी ऑनलाईन दर्शन पासमध्ये छेडछाड करून दर्शनाला जाण्याचा प्रयत्न भाविकांकडून करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. अर्थात ऑनलाईन दर्शन पासचा काळाबाजार पुन्हा एकदा समोर आला आहे. 

पवित्र श्रावण महिला लागला असून आज प्रथम श्रावण सोमवार आहे. यामुळे महादेव मंदिरात दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने येत आहेत. त्यानुसार नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे देखील पहाटेपासून भाविकांची प्रचंड गर्दी आहे. या गर्दीत तात्काळ दर्शन घेता यावे यासाठी मंदिर समितीने व्हीआयपी दर्शन पासची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र याच व्हीआयपी दर्शन पासमध्ये छेडछाड करून मंदिरात घुसण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे आज समोर आले आहे. 

Trimbakeshwar Temple
Dharashiv : शेतात काम करताना अनर्थ घडला; तीन चिमुकल्या झाल्या पोरक्या, गावाने उचलली मुलींची जबाबदारी

तारखेत बदल करून दर्शनाचा प्रयत्न  
ऑनलाईन पासच्या काळाबाजारा नंतर त्र्यंबकेश्वरमध्ये व्हीआयपी दर्शन पास मध्ये छेडछाडीचा प्रकार समोर आला आहे. या ऑनलाईन व्हीआयपी दर्शन पासवरील तारखेत बदल करून दर्शनाचा प्रयत्न उघड झाला आहे. गुजरात आणि दक्षिणेतील भाविकांकडून व्हीआयपी दर्शन पासमध्ये छेडछाड केली. पास २९ जुलैचा असताना तिने छेडछाड करून २७ तारीख केली असल्याचा प्रकार मंदिर समितीच्या लक्षात आला. यानंतर मंदिर समितीने या भाविकांना रोखले आहे. 

Trimbakeshwar Temple
Zp School : शाळेत सुविधांची वानवा; विद्यार्थिनीचे सरपंच- ग्रामसेवकाला पत्र, व्यथा मांडत सुधारण्याची मागणी

सॉफ्टवेअर अपडेट करण्याची प्रक्रिया 

४ ते ५ दिवसांपूर्वी मंदिरात तिकिटांचा काळाबाजार समोर आला होता. पास घेणे आणि विकणे हे संस्थानच्या बाहेर घडलं असून आमच्या संस्थांनच्या कर्मचाऱ्याचा त्याच्याशी संबंध नसल्याचे त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त कैलास घुले व पुरुषोत्तम कडलक यांनी स्पष्ट केले आहे. तसेच कमतरता आहे ती शोधून सॉफ्टवेअर अपडेट करतो आहे. आता आधार कार्ड अनिवार्य केलं असून क्रॉस व्हेरिफिकेशन केल्याशिवाय पास धारकांना सोडत नसल्याचे देखील त्यांनी सांगितले. तर ऑनलाईन पाससाठी एसबीआय सोबत करार करणार असून दर्शन पाससाठी आता २०४ रुपये लागतील. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com