Dharashiv : शेतात काम करताना अनर्थ घडला; तीन चिमुकल्या झाल्या पोरक्या, गावाने उचलली मुलींची जबाबदारी

Dharashiv News : तीन मुली असल्या तरी अनिल हे त्यांचा सर्व लाड पुरवायचे. इतकेच नाही तर मुलींना शिकवुन मोठं करायचं; हे अनिल यांचे स्वप्न होते. मात्र शेतात काम करताना त्यांच्यावर काळाने झडप घातली
Dharashiv News
Dharashiv NewsSaam tv
Published On

बालाजी सुरवसे 

धाराशिव : शेतीची कामे करून कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरु होता. कुटुंब आनंदी आणि समाधानी होते. मात्र एका घटनेने कुटुंबावर मोठा आघात झाला. शेतात काम करत असताना विजेच्या झटक्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाला आणि तीन चिमुकल्या पोरक्या झाल्या. राहायला पक्के घर नाही, दोन वेळचे जेवण मिळेल याचा भरवसा नाही; अशात एकटी आई तीन चिमुकल्या मुलींचा सांभाळ कशी करणार? यातून गाव एकवटले आणि मुलींची जबाबदारी घेतली. 

धाराशिवच्या खामसवाडी येथील हि हृदयद्रावक घटना आहे. गावातील शेतकरी अनिल गुंड असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. पंधरा गुंठे शेत जमीन असल्याने ट्रॅक्टर ड्रायव्हर व मजुरी अशी कामे करत अनिल गुंड हे कुटुंबाचा गाडा चालवत होते. यातच एकेदिवशी शेतात काम करत असताना विजेच्या तुटलेल्या तारेचा स्पर्श होऊन विजेचा झटका बसून त्यांचा मृत्यू झाला. यामुळे कुटुंबावर मोठा आघात झाला. पत्नी आणि तीन मुले असा त्यांच्यामागे परिवार आहे.

Dharashiv News
Amravati Crime : वाळू तस्करीला विरोध; युवकावर प्राणघातक हल्ला, तीन जण पोलिसांच्या ताब्यात

स्वप्न राहिले अर्धवट 

तीन मुली असल्या तरी अनिल हे त्यांचा सर्व लाड पुरवायचे. इतकेच नाही तर मुलींना शिकवुन मोठं करायचं; हे अनिल यांचे स्वप्न होते. यासाठी त्यांची धडपड सुरु होती. मात्र शेतात काम करताना त्यांच्यावर काळाने झडप घातली. यामुळे अनिल गुंड यांचे हे स्वप्न अर्धवटच राहिले. मोठी मुलगी पाचवीत, दुसरी मुलगी तिसरीत आणि लहान मुलगी अंगणवाडीत आहे. 

Dharashiv News
Farmer Success Story : लातूरच्या मातीत विदेशी फळ; शेतकऱ्याचा प्रयोग यशस्वी, वर्षाकाठी घेताय एकरी १२ लाखाचे उत्पादन

उघड्यावर पडलेल्या कुटुंबाला मदतीसाठी गावकरी सरसावले
दरम्यान अनिल यांचा मृत्यू झाल्याने कुटुंबाला आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी गावकरी सरसावले आहे. कुटुंबाला आर्थिक मदतीसाठी आतापर्यंत दीड लाख रुपये जमा केले आहेत. मात्र तीन मुलींच्या शिक्षणासाठी आतापर्यंत जमा केलेली रक्कम अपुरी असून मदतीसाठी आवाहन करत आहेत. अनिल गुंड यांच्या पश्चात एकट्या पत्नीवर तीन मुलींना संभाळण्याची जबाबदारी, मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी शासनाने घेण्याची आणि एक घर बांधून देण्याची ग्रामस्थांची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com