MAHARASHTRA MAKES MARATHI MANDATORY FOR AUTO AND TAXI DRIVERS NEW RULE DETAILS Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Transport : सर्व वाहनांसाठी मराठी सक्ती लागू होणार; फडणवीस सरकार मोठा निर्णय घेणार, मसुदाही तयार

Maharashtra Transport Marathi controversy : महाराष्ट्रात ऑटो-रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याचा प्रस्ताव. परवाना मिळवताना आणि नूतनीकरणासाठी मराठी ज्ञान आवश्यक असणार. संपूर्ण माहिती जाणून घ्या.

Alisha Khedekar

  • रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याचा प्रस्ताव

  • परवाना देताना मराठी येते कि नाही याची तपासणी होणार

  • प्रवासी-चालक संवाद सुधारण्याचा उद्देश

  • राज्य सरकारचा स्थानिक भाषेला प्रोत्साहन देण्याचा निर्णय

महाराष्ट्रातील ऑटो-रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या दिशेने राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ मधील नियम ४, ७८ आणि ८५ मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, यामुळे चालकांना मराठी भाषेचे व्यावहारिक ज्ञान असणे बंधनकारक होणार आहे.

राज्याच्या परिवहन विभागाने हा प्रस्ताव तयार करून गृह विभागाकडे सादर केला आहे. सध्या या संदर्भातील मसुदा अधिसूचना जारी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्रस्तावित नियमांनुसार, सार्वजनिक सेवा वाहन चालविण्याचा परवाना देताना अर्जदाराच्या मराठी भाषेच्या ज्ञानाची तपासणी केली जाणार आहे. यामुळे वाहन चालक आणि प्रवासी यांच्यातील संवाद अधिक सुलभ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

विशेष म्हणजे, मीटर असलेल्या मोटार कॅब (टॅक्सी) साठी परवाना मिळवताना मराठी भाषेचे ज्ञान ही अतिरिक्त अट लागू केली जाणार आहे. तसेच, ऑटो-रिक्षा आणि टॅक्सी चालकांना परवाना नूतनीकरणाच्या वेळी मराठी भाषेचं ज्ञान येत असल्याचा पुरावा देणं बंधनकारक असणार आहे. त्यामुळे सध्या कार्यरत असलेल्या चालकांनाही या नव्या नियमांचे पालन करावे लागणार आहे.

राज्य सरकारचा असा विश्वास आहे की, या निर्णयामुळे प्रवाशांना त्यांच्या मातृभाषेत सेवा मिळेल आणि एकूण प्रवासाचा अनुभव अधिक आरामदायक होईल. अनेकदा भाषेच्या अडचणीमुळे प्रवासी आणि चालकांमध्ये गैरसमज निर्माण होतात. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार असल्याचे सांगितले जात आहे.राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, सार्वजनिक वाहतूक सेवा अधिक प्रभावी आणि सुलभ करण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. स्थानिक भाषेला प्रोत्साहन देत प्रवाशांना अधिक मैत्रीपूर्ण सेवा देणे हेच या निर्णयामागील मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol Pump Business: पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी काय काय लागतं? जाणून घ्या खर्च, शिक्षण आणि वयोमर्यादा

Dhule Crime : दुहेरी हत्याकांडानं धुळे हादरलं! बायकोसमोर अपमान केला म्हणून मुलानं आई-वडिलांची केली हत्या

Petrol Diesel : देशातील 'या' शहरात मिळतंय सर्वात स्वस्त पेट्रोल आणि डिझेल, कारण काय? जाणून घ्या

Maharashtra News Live Update: अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी पोलिस ठाण्यासमोरच दोन गट भिडले...

Budh Ast: 9 दिवसांत या राशींना मिळणार मोठी गुड न्यूज; बुधाच्या अस्तामुळे येणार अच्छे दिन

SCROLL FOR NEXT