MAHARASHTRA SSC RESULT 2026 DECLARED: STATE RECORDS 92.09% PASS PERCENTAGE Saam tv
मुंबई/पुणे

SSC Result 2026 : महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर! 'ही' आहेत निकालाची प्रमुख वैशिष्टये

Maharashtra SSC Result 2026 Announced : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल २०२६ जाहीर केला असून राज्याचा निकाल ९२.०९ टक्के लागला आहे. या निकालाची वैशिष्टये जाणून घ्या.

Alisha Khedekar

  • महाराष्ट्र दहावीचा निकाल ९२.०९ टक्के जाहीर

  • १४ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण

  • १७९ विद्यार्थ्यांना मिळाले १०० टक्के गुण

  • कोकण विभाग पुन्हा अव्वल, नागपूरचा निकाल सर्वात कमी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) आज दहावी अर्थात SSC परीक्षेचा निकाल अधिकृतपणे जाहीर केला. यंदा राज्याचा एकूण निकाल ९२.०९ टक्के लागला असून विद्यार्थ्यांना आपला निकाल अधिकृत संकेतस्थळावर पाहता येणार आहे. राज्यभरातील लाखो विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागून राहिलेला हा निकाल समाधानकारक ठरला आहे. यंदाच्या परीक्षेसाठी राज्यभरातून १५ लाख ५५ हजार ०२६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४ लाख २० हजार ४८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी मुलांपेक्षा निकालात आपले वर्चस्व कायम ठेवले मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (Maharashtra State Board) इयत्ता १०वीच्या (SSC) निकालाची प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे :

  • एकूण उत्तीर्ण विद्यार्थी: १५ लाख ५५ हजार ०२६ विद्यार्थ्यांनी १० वीची परीक्षा देण्यासाठी नोंदणी केली होती. या विद्यार्थ्यांपैकी १४ लाख २० हजार ४८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

  • उत्तीर्णतेची उच्च टक्केवारी: राज्याचा दहावीचा एकूण निकाल ९२.०९ टक्के.

  • १००% गुण मिळवणारे विद्यार्थी: राज्यातील 179 विद्यार्थ्यांना सर्व विषयांत १००% गुण . छत्रपती संभाजीनगर मध्ये सर्वाधिक २४ विद्यार्थींना १०० टक्के गुण

  • निकाल घसरला : गेल्यावर्षीपेक्षा यावर्षी निकाल २ टक्क्यांनी घसरला.

  • मुलींची बाजी: दरवर्षीप्रमाणे यंदाही दहावीच्या निकालात मुलींनी मुलांपेक्षा चांगली कामगिरी केली आहे, म्हणजेच उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा जास्त आहे.

  • कोकण विभाग अव्वल: विभागवार निकालात कोकण विभाग अनेक वर्षांपासून अव्वल स्थानी राहण्याची परंपरा कायम आहे.

  • कमी गुणांचा टक्का: दरवर्षी लातूर किंवा बीड जिल्ह्याचा १०वीचा निकाल कमी लागतो मात्र या वर्षी नागपूर शहराचा निकाल कमी लागला आहे.

कसा पाहाल निकाल?

विद्यार्थी आपला निकाल https://results.digilocker.gov.in, https://mahahsscboard.in, https://sscresult.mkcl.org, https://results.targetpublications.org, https://results.navneet.com या अधिकृत संकेतस्थळांवर पाहू शकतात. या संकेतस्थळावर गेल्यावर तुमचा सीट नंबर टाका. नंतर तुमच्या आईचे नाव इंग्रजीत टाका. निकाल पाहण्यासाठी 'View Result' बटणावर क्लिक करा. यानंतर तुमचा रिजल्ट तुमच्या स्क्रीनवर पाहायला मिळेल. निकालाचा स्क्रीनशॉट किंवा प्रिंट आउट काढू शकता

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

इंधन दरवाढीने पालकांचं बजेट कोलमडणार; स्कूल बसच्या भाड्यात मोठी वाढ

पोलिसांनी जिवंत मुलीला मृत मानलं; निर्दोष वडील-भावाला जेलमध्ये डांबलं, नंतर तरुणी घरी परताच प्रशासन हादरलं

Maharashtra News Live Update: बकरी ईदच्या दिवशी पुसद ग्रामीण पोलिसांची अवैध शस्त्राविरोधात कारवाई

Vijay Deverakonda: विजय देवरकोंडाच्या गळ्यात रश्मिकाच्या नावाचे पेंडन्ट; चाहते म्हणाले, मॉर्डन मंगळसूत्र

Reel Star Death: प्रसिद्ध महिला रिलस्टारची हॉटेलमध्ये आत्महत्या, तपासातून धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT