ashok kharat news Saam tv
मुंबई/पुणे

विद्यार्थिनीलाही सोडले नाही, भोंदू अशोक खरात पुरता अडकला; पोलिसांत आणखी एक गुन्हा दाखल

ashok kharat news : भोंदू अशोक खरातच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्याच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे.

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही, नाशिक

भोंदूबाबा अशोक खरातविरोधात आणखी एक गुन्हा

विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप

अशोक खरातच्या विरोधातील गुन्ह्यांची संख्या सहावर

भोंदूबाबा अशोक खरातला अटक केल्यानंतर त्याचे एका पाठोपाठ एक काळे कारनामे समोर येऊ लागले आहेत. त्याच्या काळ्या कृत्याने महाराष्ट्र हादरून गेला आहे. भोंदूबाबा खरातने किती महिलांचं लैंगिक शोषण केलं, त्याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या तपासादरम्यान भोंदू खरातच्या विरोधात आणखी एक लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. या नराधमाने विद्यार्थिनीलाही सोडले नसल्याचे समोर आलं आहे.

विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याप्रकरणी भोंदू खरातच्या विरोधात आणखी एक गुन्हा नोंदवण्यात आला आहे. खरात विरोधातील एकूण गुन्ह्यांची संख्या सहावर पोहोचली आहे. खरातच्या विरोधात महिलांच्या तक्रारी वाढू लागल्याने पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली आहे. खरातच्या विरोधात लग्न, धार्मिक विधी आणि तंत्र-मंत्राच्या नावाखाली फसवणुकीचा आरोप आहे

खरातकडून विश्वस्तांची फसवणूक

भोंदू अशोक खरातकडून ट्रस्टवरील विश्वस्तांची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे. शिवनिका संस्थानच्या स्थापनेवेळी अभ्यासिका, CBSC शाळा, गो शाळा सुरू करण्याचं आश्वासन दिलं होतं. धार्मिक कार्यासोबतच सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात ट्रस्ट काम करणार असल्याचं चित्र उभं केलं. मात्र १५ वर्षात बाबाची संपत्ती आणि कारनामे वाढले, मात्र इतर उपक्रम सुरूच केले नाही. टाटा इंडिकापासून सुरू झालेला त्याचा 'कार'नामा थेट मर्सडीजपर्यत गेल्याचा स्थानिकांचा दावा आहे.

खरातच्या उत्पन्नात अचानक मोठी वाढ

नाशिकच्या मिरगावमधील ‘श्री शिवनिका संस्थान’च्या आर्थिक व्यवहारांचा मोठा खुलासा झाला आहे. ऑडिट रिपोर्टमधून संस्थानच्या झपाट्याने वाढीचा तपशील समोर आला आहे. शिवनिका संस्थेने कोट्यावधींची झेप घेतली. आधी लाखांची तूट त्यानंतर कोट्यावधींच्या देणग्यांचा महापूर आल्याचे समोर आले.

२०२० ते २०२२ दरम्यान उत्पन्न फक्त ४.९० लाखांच्या घरात होते. तर १.६० ते १.६४ लाख रुपयांची तूट नोंद आहे. परंतु अशोक खरातसाठी २०२४ वर्ष ‘गेम चेंजर’ ठरलं. त्या वर्षात ७६ लाख ९१ हजार ४१६ रुपयांच्या देणग्यांचा ‘महापूर’ दिसून आला. खर्च वजा जाता तब्बल ७०.६६ लाखांची विक्रमी रक्कम शिल्लक आहे. संस्थानची आर्थिक स्थिती अचानक मजबूत झाल्याचे दिसून आलेय.

२०२२ मध्ये ९६ लाखांची मालमत्ता होती. त्यानंतर २०२५ पर्यंत वाढून १ कोटी ८१ लाखांवर पोहोचली. संस्थेच्या बँकेत २३ लाख ३५ हजार रुपयांच्या मुदत ठेवी आहेत. संस्थानच्या पैशांचा स्रोत तपासाच्या केंद्रस्थानी आहे. देणग्यांचा ‘महापूर’ नेमका कुठून आला? याचा छडा लावला जाणार सागंण्यात आलं आहे. अशोक खरातच्या संपत्तीत अवघ्या ८ वर्षांत ७४ पटीने वाढ झाल्याचे समोर आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GenZ Fashion : 'कमी कपडे, जास्त लुक्स!' काय आहे Gen Z चा कैप्सूल वॉर्डरोब ट्रेंड?

Maharashtra News Live Update: गडचिरोलीत पेट्रोल-डिझेलचा तुटवडा; अनेक पंपांवर ‘No Petrol, No Diesel’चे फलक

Crime News: महाराष्ट्र हादरला!२ मित्रांनी केला घात, लॉजवर नेऊन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीसोबत भयंकर कृत्य; मारहाण करत...

Navratri Vastu Tips: नवरात्रीत घरातील 'या' ७ गोष्टी चुकूनही रिकाम्या ठेवू नका; जाणून घ्या वास्तुशास्त्रातील मान्यता

Pre wedding shoot Locations: परदेशात जाण्याची गरज नाही! भारतातील 5 सुंदर - रोमँटिक ठिकाणे; प्री-वेडिंग शूटसाठी ठरतील बेस्ट

SCROLL FOR NEXT