Maharashtra Road Accident 8900 deaths in Last seven months mumbai decrease pune increased Saam TV
मुंबई/पुणे

Road Accidents: राज्यात रस्ते अपघातात मोठी वाढ, ७ महिन्यात ८ हजारांहून अधिक मृत्यू; पुण्यातील आकडेवारी धडकी भरवणारी

Maharashtra Road Accidents: मागील काही महिन्यांपासून राज्यातील रस्ते अपघातात मोठी वाढ झाली आहे. वाढते अपघात आणि त्यातून होणारी जीवितहानी ही चिंता वाढवणारी आहे.

साम टिव्ही ब्युरो

Road Accidents Latest News: मागील काही महिन्यांपासून राज्यातील रस्ते अपघातात मोठी वाढ झाली आहे. वाढते अपघात आणि त्यातून होणारी जीवितहानी ही चिंता वाढवणारी आहे. वाहनचालकांच्या बेजबाबदारपणाने रस्ते अपघात होत असून अनेकांना आपला जीव लागत असल्याची माहिती डॉ. रवींद्र सिंघल (अतिरिक्त पोलीस महासंचालक, वाहतूक) यांनी दिली आहे. पुण्यातही अपघातांचं प्रमाण वाढलं असून गेल्या ७ महिन्यातील आकडेवारी धडकी भरवणारी आहे. (Latest Marathi News)

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी ते जुलै २०२३ या कालावधीत राज्यात एकूण १९,७१९ अपघात झाले असून या अपघात ८,९०७ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत होणाऱ्या अपघातांचं प्रमाण घटलं असून पुण्यातील प्रमाण वाढलं आहे. पुण्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अपघात व मृत्यू वाढले आहेत.

गेल्या वर्षी जानेवारी ते जुलै या सात महिन्यांत ४९४ अपघातात (Accident) १८९ लोकांचा मृत्यू झाला तर ३५२ जण जखमी झाले होते. यंदा सात महिन्यात ७०५ अपघातांत २०५ मृत्यू तर ५०२ जण जखमी झाले. तर मुंबईत रस्ते अपघातात घट झाल्याचं दिसून येत आहे. गेल्या ७ महिन्यांमध्ये मुंबईत ५५१ अपघात झाले असून या अपघातात १४८ जणांचा मृत्यू झाला.

गेल्यावर्षीच्या तुलनेत यामध्ये ५९० नी घट झाली आहे. सध्याच्या घडीला राज्यात ३ कोटी ४७ लाख ७३ हजार ६२५ वाहनांची नोंदणी झालेली आहे. देशात रस्ते अपघातात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर असून हे अपघात कमी करण्यासाठी परिवहन विभागासह वाहतूक पोलीस विविध उपाययोजना राबवित आहेत.

रस्ते अपघातांच्या कारणांमध्ये आयुर्मान पूर्ण झालेल्या गाड्यांतून प्रवासी वाहतूक करणे, वेगाने वाहन चालवणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी गाडीत बसविणे, गाडी चालवताना मोबाइलचा वापर करणे, पुरेशी विश्रांती न घेता वाहन चालवणे ही कारणे आहेत. अपघात आणि त्यातून होणारी मनुष्यबळाची हानी फार गंभीर आहे, अशी खंत डॉ. रवींद्र सिंघल यांनी व्यक्त केली आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray-Uddhav Thackeray: 'एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी...', राज - उद्धव ठाकरेंचे मराठी विजय मेळ्याव्यातील अभूतपूर्व क्षण

Green Bangles Shravan : श्रावण महिन्यात सुवासिनी हिरव्या बांगड्या का घालतात?

ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबलं अन् कार थेट गंगेत; नाविकांनी वाचवले नवऱ्या-बायकोचे प्राण;VIDEO

Vijay Melava Worli: 'ऐ काका उठना.....' राज ठाकरेंनी सांगितला बाळासाहेबांसोबतचा तो किस्सा, पाहा, VIDEO

Maharashtra Live News Update: चांदोली धरणातून‌ 4 हजार 500 क्युसेक विसर्ग

SCROLL FOR NEXT