MAHARASHTRA WEATHER UPDATE: IMD ISSUES YELLOW ALERT FOR SATARA, SOLAPUR AND DHARASHIV; RAIN RELIEF ACROSS STATE Saam Tv
मुंबई/पुणे

Rain Update : राज्यात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस, 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट; तुमच्या भागातील हवामानाचा अंदाज काय? वाचा

Maharashtra Weather Update Today News : राज्यात पुन्हा पावसाची हजेरी लागली आहे. सातारा, सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यांसाठी IMD ने येलो अलर्ट जारी केला असून अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता.

Alisha Khedekar

  • राज्यात पुन्हा पावसाने हजेरी लावली

  • सातारा, सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट

  • मुंबईसह कोकण, पुणे भागातही पावसाच्या कोसळधारा

  • विदर्भात मात्र उष्णतेची लाट कायम

Maharashtra Today Rain Update News राज्यात तापमानात वाढ झालेली असतानाच काल पासून पुन्हा पावसाने हजेरी लावली असून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. आज मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दुसरीकडे विदर्भात मात्र उष्णतेची लाट कायम राहणार असून नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागणार असल्याचा अंदाज हवामान विभागने वर्तवला आहे. मुंबईत आज सकाळपासून पावसाची रिमझिम सुरु आहे.

IMD चा अंदाज काय?

IMD ने आज सातारा, सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह ताशी ४० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून काही ठिकाणी वादळी पाऊस पडू शकतो. याशिवाय पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सांगली, बीड, लातूर, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांतही विजांसह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पुणेकरांसाठी पुढील ४ ते ५ दिवस महत्त्वाचे

पुणे शहर आणि परिसरात पुढील तीन ते चार दिवस आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम देशाच्या पूर्व आणि ईशान्य भागांवर होत असून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम

या हवामानामुळे राज्यातील वातावरणातही काही प्रमाणात बदल होत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. आगामी काही दिवस राज्यातील विविध भागांत ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पावसाच्या सरी कायम राहण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आंबोलीमधील दरीत कोसळलेल्या पर्यटकाचा मृतदेह बाहेर काढण्यात रेस्कू टीमला यश

DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! डीए वाढीची प्रतीक्षा संपली; सरकारने जारी केलं अधिकृत नोटिफिकेशन, जाणून घ्या कोणाला लाभ

Property Dispute: वडिलांच्या प्रॉपर्टीवर मुलं हक्क सांगू शकतात का? वडिलोपार्जित संपत्तीवर कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

Coffee Benefits: दिवसाची सुरुवात कॉफीने करता? रिकाम्या पोटी कॉफी पिण्याचे फायदे-तोटे जाणून घ्या

Rain Update : जुलै महिन्यात महाराष्ट्रात ७ टक्के जास्त पाऊस, मराठवाडा मात्र कोरडाच

SCROLL FOR NEXT