Rain Update Saam tv
मुंबई/पुणे

Rain Update| पुढील ४ दिवस राज्यातील या विभागात मुसळधार, हवामान विभागाने दिला इशारा

गेल्या काही दिवसापासून राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: गेल्या दोन दिवसापासून राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस (Rain) सुरू आहे. पुढील चारही दिवस कोकणासह राज्यातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

राज्यात काल पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. आजही मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे. राज्यातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. पुढील चार दिवसांसाठी हवामान विभागाचे ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. (Maharashtra Rain Update)

या जिल्ह्यांना हवामान विभागाचा इशारा

पालघर आणि रायगड जिल्ह्यासाठी हवामान विभागाने ऑरेज अलर्ट जारी केला आहे. ठाणे, पुणे आणि रत्नागिरीसह विदर्भातील सर्व जिल्ह्यांना १७ सप्टेंबरला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर १८ ते २० सप्टेंबरला विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, आणि मराठवाड्यामधील जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. (Maharashtra Rain Update)

आज पहाटेपासून मुंबईसह महानगरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या चार दिवसापासून राज्यातील काही भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. राज्यात गणेश उत्सव काळात पावसाने विश्रांती घेतली होती.

यावर्षीचा मान्सून एक महिना उशीरा सुरू झाला. पण तरीही मान्सून मोठ्या प्रमाणात झाला आहे. विदर्भासह, मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. तर कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसाने हजेरी लावली. (Maharashtra Rain Update)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर गॅस टँकर उलटला, मोठ्या प्रमाणात गॅसगळती, १६ तासांपासून महामार्ग ठप्प, पाहा व्हिडिओ

Ajit Pawar Death: 'अजितदादांचा विमान अपघात हा ऑपरेशन लोटसचा भाग?', खासदाराच्या विधानाने खळबळ

NCP: राष्ट्रवादी विलिनीकरणासाठी कुणाची मध्यस्थी?, महाराष्ट्राच्या माजी मंत्र्यांचे खळबळजनक दावे

Homemade Energy Drinks Recipe: घरच्या घरी बनवा 5 प्रकारचे 'एनर्जी ड्रिंक्स', थकवा कायमच निघून जाईल

Pune : पुण्यातील धक्कादायक घटना, भाजप राष्ट्रीय प्रवक्त्याच्या आईला कारने उडवले, CNG पंपावरील व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT