Maharashtra Rain Update Saam Tv
मुंबई/पुणे

उद्यापासून मुंबईसह महाराष्ट्रात धो-धो बरसणार; हवामान विभागाची माहिती

कालपासून मुंबईसह राज्यभरात पावसाला सुरुवात झाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: कालपासून मुंबईसह राज्यातील काही भागात पावसाला सुरुवात झाली आहे. तर काही भागात अजुनही पावसाला (Rain) सुरुवात झालेली नाही. राज्यात काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत, तर काही ठिकाणी अजुनही शेतकरी (Farmer) पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. आता मंगळवारपासून राज्यात जोरदार पाऊस बरसण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. (Maharashtra Rain Update)

या वर्षी मान्सून वेळेआधी दाखल होण्याचा अंदाज होता, पण गेल्या महिनाभरात जास्त प्रमाणात पाऊस बरसला नाही. त्यामुळे राज्यातील धरणांच्या पाणी साठ्यात घट झाली होती. तसेच शेतकऱ्यांनी पेरणीही अजून केली नव्हती. आता पुन्हा पेरणीला सुरुवात झाली आहे.

रविवारी राज्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. विदर्भासह, मध्य महाराष्ट्र, कोकण या ठिकाणी काही प्रमाणत पाऊस (Rain) झाला. आज सोमवार ४ जुलै पासून ६ जुलैपर्यंत मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार पाऊस बरसण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांमध्ये ४ जुलै पासून मुसळधार पाऊस पडण्याती शक्यता वर्तवली जात आहे. या शिवाय मुंबई, मुंबई उपनगर , कोकण भागातही मुसळधार बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. (Maharashtra Rain Update)

गेल्या एक महिन्यापासून राज्यात पावसाने (Rain) दडी मारली होती. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी अजुनही पेरणीची कामे केलेली नाहीत. आता राज्यभरात पावसाची सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामांना सुरुवात केली आहे. (Maharashtra Rain Update)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मादुरोंनंतर आता खोमेनींचं अपहरण करणार? इराणच्या सर्वोच्च नेत्याला पकडणार?

Tuesday Horoscope : घराचं स्वप्न लवकरच सत्यात उतरणार; ५ राशींच्या लोकांच्या मनातील इच्छा पूर्ण होणार

आई महापालिकेत सफाई कामगार; आता त्याच पालिकेत मुलगा नगरसेवक म्हणून बसणार

Konkan Politics: ऐन झेडपीच्या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का; धडाधड ४३ पदाधिकाऱ्यांचे सामुहिक राजीनामे, राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबईच्या महापौर निवडीवरून ट्विस्ट; जुनी रोटेशन पद्धत बदलणार, कोणाला मिळणार संधी?

SCROLL FOR NEXT