Pune Water Supply 
मुंबई/पुणे

Pune Water : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' भागातील पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकात मोठा बदल, वाचा कधी कुठे येणार पाणी

Pune Water Supply : पुणे महापालिकेच्या भामा-आसखेड योजनेतंर्गत नव्याने बांधलेल्या टाक्यांमुळे विमाननगर, लोहगाव, धानोरी, कलवडसह अनेक भागातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक ३१ जुलै २०२५ पासून बदलण्यात आले आहे.

Alisha Khedekar

  • भामा-आसखेड योजनेअंतर्गत पुण्यात नवीन पाणी टाक्यांमुळे ३० हून अधिक भागांचे वेळापत्रक बदलले.

  • हे नवीन पाणीपुरवठा वेळापत्रक ३१ जुलै २०२५ पासून लागू होणार आहे.

  • विविध भागांत पहाट, सकाळ, दुपार व रात्री वेगवेगळ्या वेळांना पाणीपुरवठा होईल.

  • पुणेकरांना सुरुवातीला काही अडचणी येऊ शकतात, पण सहकार्य करावे असे महापालिकेचे आवाहन आहे.

पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुणे महापालिकेच्या भामा-आसखेड पाणी पुरवठा योजनेअंतर्गत नव्याने बांधलेल्या टाक्यांमधून पाणीपुरवठा सुरू होणार असून, त्यामुळे काही भागातील पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

पुणे महापालिकेने विमाननगर, लोहगाव, हरणतळे, धानोरी, कलवड आणि आजूबाजूच्या परिसरात भामा-आसखेड धरणावर आधारित पाणीपुरवठा व्यवस्था सुधारण्यासाठी नवीन पाण्याच्या टाक्या उभारल्या आहेत. या नवीन संरचनेमुळे पाणीपुरवठ्याच्या वेळा पुनर्निर्धारित करण्यात आल्या असून, हे सुधारित वेळापत्रक ३१ जुलै २०२५ पासून लागू होणार आहे.

योजनेनुसार, पहाटे, सकाळी, दुपारी व रात्री अशा वेगवेगळ्या कालावधीत विविध भागांना पाणीपुरवठा केला जाईल. त्यामुळे नागरिकांनी नवीन वेळापत्रकानुसार पाण्याचा वापर नियोजनबद्ध करावा, असे आवाहन बंडगार्डन पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एकनाथ गाडेकर यांनी केले आहे.

गाडेकर पुढे म्हणाले की, “पाणीपुरवठा अधिक कार्यक्षम करण्यासाठी या बदलांची अंमलबजावणी केली जात आहे. प्रारंभी काही अडचणी निर्माण होऊ शकतात, परंतु नागरिकांनी सहकार्य करावे.”

पुण्यात विमाननगर, धानोरी परिसरातील पाणी पुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल; जाणून घ्या कोणत्या भागात कधी पाणी येणार?

रात्री : ८.४५ ते रात्री : ११.३० -कमल पार्क परिसर

सकाळी ४.४५ ते सकाळी १०.०० -माधवनगर परिसर

दुपारी: ३.०० ते रात्री: १०.३०- धानोरी गावठाण परिसर

सायंकाळी ७.३० ते रात्री: ११.४५ - भैरव नगर रस्ता क्रमांक १०, गोकुळनगर मुख्य रस्ता

सकाळी ४.०० ते सकाळी ११.०० - भैरवनगर रस्ता क्रमांक ११ ते १५ परिसर

दुपारी: १२.०० ते दु: १.३० -मुंजाबा वस्ती रस्ता क्रमांक ११ अर्धा भाग

सायं: ७.३० ते रा: ११.४५ - हरेकृष्ण पार्क, आंबेडकर कॉलेज परिसर

सकाळी: ४.०० ते सकाळी: ११.०० - गोकुळनगर परिसर, भैरवनगर (अर्धा भाग), आनंद पार्क (अर्धा भाग)

दुपारी : ३.०० ते सायं: ६.०० - भैरवनगर (अर्धा भाग), श्रमिकनगर (अर्धा भाग)

सायं: ७.३० ते रा: ११.४५ - श्रमिकनगर (अर्धा भाग), आनंद पार्क (अर्धा भाग)

दुपारी: १.३० ते सायं: ५.३० - परांडे नगरपरिसर

दुपारी १२.०० ते दुपारी ३.०० - मुंजाबा वस्ती रस्ता क्रमांक ११ ते १७ (गल्ली नं.१० अर्धा भाग)

पहाटे ४.३० ते सकाळी ८.३० - चौधरी नगर गल्ली क्रमांक १ ते २३

दुपारी ३.३० ते रात्री १०.३० - मुंजाबा वस्ती रस्ता क्रमांक १ ते १०

सायं. ७.१५ ते रात्री: ११.०० - खेसे पार्क, धानोरी जकात नाका, बी.यु. भंडारी

सकाळी ५.४५ ते सकाळी ९.१५- सिद्धार्थनगर परिसर

दुपारी ३.०० ते रात्री : १०.३०- तुषार पार्क परिसर

सकाळी ४.१५ ते सकाळी ७.४५- कलवड परिसर

सकाळी: ११.४५ ते दुपारी ३.१५ - कलवड पोरवाल रस्ता

पहाटे ४:३० ते दुपार ८:०० - हवालदार मळा, कुमार समृद्धी, हरीप्रसाद सोसायटी, फादर मायकेल सोसायटी

सकाळी १०:०० ते दुपारी २:०० -आशीर्वाद सोसायटी, तिरुपती कॉम्प्लेक्स, संतोष नगर, एकता नगर ,सिद्धेश्वर क्रमांक १,२,३

सायं. ४.३० ते रात्री ८.०० - वैभव कॉलनी,तुकाराम सोसायटी

सकाळी ६:३० ते सकाळी १०.३० - विद्यानगर गल्ली क्रमांक १० (उजवी बाजू ), ११, १३, १४

दुपार. १:३० ते रात्री ७.३० - आदर्श कॉलनी रस्ता ६,७,८,९ व १० (डावी बाजू)

पहाटे ३:३० ते पहाटे ५:०० - ओवर फ्लो

पहाटे ५:०० ते सकाळी ७:५० - महाराष्ट्र हौसिंग बोर्ड झोनिंग

सकाळी ६:०० ते सकाळी ९:३० -नागपूर चाळ (डावी)

सकाळी ९:३० ते दुपारी . १२:३०-नागपूर चाळ (उजवी)

सकाळी ९:३० ते दुपारी . १२:३०

सकाळी ६:०० ते सायं. ६:०० -जेल रस्ता

सायं ७:०० ते रात्री. ८:३० -महाराष्ट्र हौसिंग बोर्ड झोनिंग

सकाळी. ६:०० ते सकाळी ७:३०-त्रिदल नगर

सकाळी ६:३० ते सकाळी ९:००-साकोरे नगर संपूर्ण

पहाटे ४:१५ ते सकाळी ६:४५ -निको गार्डन, मंत्री मार्केट, आर्या नगर, हयात हॉटेल, झिरकॉन सोसायटी

पहाटे ४:१५ ते सकाळी ७:०० - कोणार्क नगर, लुंकड गोल्ड कोस्ट,

सकाळी ७:०० ते सकाळी १०:०० -संजय पार्क छोटा , कोणार्क कॅम्पस, मोठा संजय पार्क, साकोरे नगर काही भाग, झिरकॉन सोसायटी

दुपारी ३:०० ते सायं. ६.०० जैन मंदिर झोन, श्री कृष्ण हॉटेल परिसर

सायं ६.०० ते रात्री : ९.०० - क्लोवर क्रेस्ट, विमान ज्वेल सोसायटी

रात्री .९.०० ते रात्री १२:०० - श्रावणी गार्डन, भारत फोर्स सोसायटी, भटनागर सोसायटी, तरबेज झोन, यशोदानंदन सोसायटी

सकाळी ४:४५ ते सकाळी १०:०० - धीनगर . शांती रक्षक सोसायटी, पी डब्ल्यू कॉलनी, हरमेश हरीतेज

सायं ५:४५ ते रा. ७:०० - शास्त्रीनगर, नगर रस्ता ती व्ही एस शो रूम

पहाटे ४ ते सकाळी ८ - यमुना नगर

सकाळी ८.०० ते दुपारी १२.३०- राजीव नगर नॉर्थ, म्हाडा कॉलनी,

दुपारी ३:०० ते रात्री ९.००- एसआरए, राजीव नगर गल्ली क्रमांक १३

पहाटे ५:१५ ते सकाळी ७:१५ - गणेश नगर, सुभाषनगर, बी डी कामगार, बनसोडे चौक पर्यंत

सकाळी १०:०० ते दुपारी २:३० -जयभवानी नगर मते नगर , खराडकर नगर, बालाजी नगर, टेम्पो चौक टाकी परिसर

सकाळी १०:०० ते दुपारी. २:३० -रामनगर, पोटे चाळ, पोटे इमारत, इंद्रप्रस्थ सोसायटी, समर्थ नगर, विश्वकर्मा सोसायटी, विद्यानगर, मुरलीधर सोसायटी

पहाटे ५:३० ते सकाळी ७:३० -रघुवीर नगर, राजेंद्र नगर, गणेश नगर, वाडेश्वर नगर, घरकुल सोसायटी, गुरुकृपा सोसायटी

सायं ५:३० ते रात्री ८:०० - शेजवळ पार्क गल्ली क्रमांक १ ते १२, बी डी कामगार १ ते १६ गल्ली, बोराटे वस्ती १ ते १४ गल्ली, दत्त हॉटेल परिसर यशवंत नगर

सकाळी. ११:०० ते दुपारी. २:०० -न्याती इलीसिया, गंगा सरोवर, झेन सोसायटी

सकाळी. ७:३० ते सकाळी. १०:००- वाडेश्वर नगर, महादेव नगर, जुना मुंढवा रोड, कुमार प्रायम वेरा, कुमार परिषद.

रात्री ७:०० ते रात्री १०:०० - मारुती नगर, गलांडे नगर, साईनाथ नगर

पहाटे २:३० ते पहाटे ५:०० - ब्रम्हा सनसिटी, स्प्लेन्देर सोसायटी, बेलमक सोसायटी, एफ रेसिडन्सी, ब्रह्मा प्लॅटिनम

पहाटे ५:०० ते सकाळी. १०:०० -साईकृपा विठ्ठल नगर, नवरत्न योगेश्वर, कमाल नगर, इंडियन एज्युकेशन , खालची बालवडकर चाळ, मोतीह्सेथ दत्त नगर इनामदार शाळा या सर्व परिसरातील उताराचा भाग.

सकाळी ९:०० ते दुपारी १२:०० - सोपान नगर

सकाळी १०:०० ते दुपारी २:३० -जयहिंद मेडिकल गल्ली, महावीर नगर, मल्हार नगर, पोस्ट ऑफिस समोर, हर्सिचान्द्र (मुनुरवार सोसायटी), माळवाडी, संत हॉस्पिटल, उंबर चौक गावठाण वडगाव शेरी

दुपारी ३:४५ ते सायं. ६:१५ - वडगाव शेरी गावठाण, स्मशान भूमी परिसर

सायं. ६:१५ ते रा. ८:३० -यशवंतनगर, सैनिक वाडी, न्याती

रात्री ८:३० ते रात्री ११:१५ -साईकृपा विठ्ठल नगर, नवरत्न योगेश्वर, कमाल नगर, इंडियन एज्युकेशन, खालचा बालवडकर चाळ, मोतीशेठ दत्त नगर इनामदार शाळा या सर्व परिसरातील चढाचा भाग.

सायं. ६:०० ते रात्री ११:०० -मिलेट्री परिसर, शुभम सोसायटी

भामा-आसखेड योजनेअंतर्गत काय बदल झाले आहेत?

या योजनेअंतर्गत पुण्यात नवीन पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या असून त्यामुळे विविध भागातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे.

हे नवीन वेळापत्रक कधीपासून लागू होणार आहे?

हे सुधारित वेळापत्रक ३१ जुलै २०२५ पासून लागू करण्यात येणार आहे.

कोणकोणते भाग या बदलांच्या प्रभावाखाली येतील?

विमाननगर, लोहगाव, धानोरी, हरणतळे, कलवड, वडगाव शेरी, साकोरेनगर, सुभाषनगर, मुंजाबा वस्ती, भैरवनगर, आदर्श कॉलनी यासह ३० पेक्षा अधिक भागांचा समावेश आहे.

नागरिकांना काय सूचन करण्यात आल्या आहेत?

नागरिकांनी पाण्याचा वापर नियोजनबद्ध करावा व सहकार्य करावे, असे PMC पाणीपुरवठा विभागाने सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tirgrahi Yog: 50 वर्षांनी सूर्याच्या राशीत बनणार पॉवरफुल त्रिग्रही योग; 3 राशींचं नशीब चमकणार, धनलाभ होणार

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

SCROLL FOR NEXT