Pune : एसटी बसने दुचाकीला चिरडले Saam Tv
मुंबई/पुणे

Pune : एसटी बसने दुचाकीला चिरडले, ४ जणांचा जागीच मृत्यू, पुण्यात भयंकर अपघात

Pune Junnar Accident death : जुन्नरमध्ये अहिल्यानगर- कल्याण महामार्गावर भीषण अपघात झालाय. आळेफाटा जवळ एसटी बसने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील चार जणांचा जागीच मृत्यू झाला.

Namdeo Kumbhar

रोहिदास घाडगे, पुणे प्रतिनिधी, साम टीव्ही मराठी

Pune Junnar ST bus Accident death News : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात रात्रीच्या वेळी एक भीषण अपघाताची घटना घडली. अहिल्यानगर-कल्याण महामार्गावरील आळेफाटा परिसरात एसटी बसने दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील चारही जणांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली आहे. (ST bus hits motorcycle in Junnar, four killed )

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कल्याणहून आळेफाट्याकडे जाणाऱ्या एसटी बसने दुचाकीला धडक दिली. अपघातानंतर घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. नागरिक आणि पोलिसांनी तातडीने मदतकार्य सुरू करत मृतदेह ताब्यात घेतले. या अपघातामुळे महामार्गावर काही काळ मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती, मात्र पोलिसांनी तत्परता दाखवत वाहतूक पूर्ववत केली.

मृतांची ओळख पटवण्याचे काम सध्या सुरू असल्याची माहिती मिळतेय. या अपघातामधील मृत सर्वजण एकाच कुटुंबातील किंवा मित्रपरिवारातील असावेत, असा प्राथमिक अंदाज आहे. अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला? याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. या भीषण दुर्घटनेमुळे जुन्नर तालुक्यावर शोककळा पसरली असून, महामार्गावरील वाढत्या अपघातांबाबत नागरिकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टाची ज्ञानेश कुमारांना नोटीस SIR विरोधातील लढाईला कायदेशीर बळ?

काशी विश्वनाथाच्या कळसाचं सोनं चोरीला? PMO कडे तक्रार,मंदिर प्रशासनानं आरोप फेटाळले

Friday Horoscope: अडकलेली कामं पूर्ण होतील, या 4 राशींच्या नशीबी आज पैसा; वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

16 ऑक्टोबरला सरकारविरोधात CJPचा तिरंगा मोर्चा, कनॉट प्लेसचं 'जंतरमंतर' होणार

Fact Check: व्हॉट्सअॅपवर 'NO' लिहाल अकाऊंटमधील पैसे गमवाल? छोट्याश्या चुकीमुळे कष्टाचे पैसे घालवून बसाल?

SCROLL FOR NEXT