Aaditya Thackeray saam tv
मुंबई/पुणे

Aaditya Thackeray News: राज्याचे मुख्यमंत्री कार्यालय दिल्ली चालवतेय, आदित्य ठाकरेंचा शिंदेंना टोला

Aaditya Thackeray On CM Eknath Shinde: मागील दोन दिवसांपासून ते काहीच बोलत नाहीये. मी माहिती घेतली तर कळलं की आता गद्दार आणि भाजपमध्ये वाद सुरू झाले आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

साम टिव्ही ब्युरो

>> सुशांत सावंत

Maharashtra Politics: शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा हल्लाबोल केला आहे. हल्ली राज्याचे मुख्यमंत्री कार्यालय हल्ली दिल्ली चालवत आहे असा टोला त्यांनीआदित्य ठाकरेंनी शिंदेंना लगावला आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले एक गट असा आहे, ज्यांच्याकडे 40 पेक्षा अधिक लोक नाहीये. आपला कार्यकर्ता मेळावा एक सभा वाटतो आणि त्यांच्याकडे खुर्च्यांची गर्दी होते. गेले सात ते आठ महिने गद्दार मला शिव्या घालत आहेत. मात्र मागील दोन दिवसांपासून ते काहीच बोलत नाहीये. त्यावर मी माहिती घेतली तर कळलं की आता गद्दार आणि भाजपमध्ये वाद सुरू झाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री कार्यालय हल्ली दिल्ली चालवत आहे अशी खोचक टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

ते म्हणाले, मी शिवसेनाच म्हणणार, कारण ते जे आहेत चोर आणि गद्दार आहेत. निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय लोकशाहिला घातक आहे. ही गद्दारी कुणालाही पटलेली नाही. मी राज्यात ज्या ठिकाणी जातो तिथेलोक अनेक घोषणा देतात. गद्दार मुख्यमंत्री आहेत काही दिवसात जाणार आहेत, त्यांना एकच घोषणा ऐकू येते 50 खोके एकदम ओके. 50 खोके एकदम ओके म्हटल्यावर त्यांना झोबतं, असेही ते म्हणाले. (Latest Marathi News)

पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, अजूनही 40 गद्दारामधून एकही पुढे आला नाही आणि म्हणाला नाही की मी घेतले नाही. त्यातील काही जण लॉबीत येतात आणि म्हणतात, आम्हाला साहेब परत घेतील का? तुम्ही ज्या दरवाजाने गेलात तिथेच रहा. आता एक एक कॅरेकटर दिसत आहेत. आपण कसे इतके वर्ष यांना सोबत घेऊन बसलो होतो असा प्रश्न पडतो. भाजपला देखील हे कसे पटतात? आपल्या मुख्यमंत्री यांनी परवा पंतप्रधानच बदलून टाकले असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला. (Latest Political News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हिंगणघाट येथे आगमन

Municipal Corporation Election: मुंबई, पुण्यास राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुका कधी होणार?

गगनचुंबी ८ इमारतींचा कोळसा; आगीत १२८ जणांचा होरपळून अंत, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

MNS Prakash Bhoir : इंजिन सोडून कमळाकडे धरली वाट! बड्या नेत्याने सोडली राज ठाकरेंची साथ

Ragi Chocolate Cookies Recipe: संध्याकाळी लागलेल्या भूकेसाठी घरच्या घरी बनवा हेल्दी आणि टेस्टी रागी चॉकलेट कुकीज

SCROLL FOR NEXT