Sheetal Mhatre News: 'त्या' व्हायरल व्हिडिओवर शितल म्हात्रे यांची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाल्या; 'एकनाथ शिंदेंसोबत गेल्यानेच...'

रविवारी पहाटे शीतल म्हात्रे यांनी याबाबत दहिसर पोलिसात तक्रार केली होती. या व्हिडिओवर आता शितल म्हात्रे यांनी पत्रकार परिषद घेत खुलासा केला आहे.
Sheetal Mhatre
Sheetal MhatreSaam TV
Published On

Mumbai News:  शिवसेना पक्षाच्या नेत्या आणि प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे या दोघांचा एक व्हीडिओ मॉर्फ करुन सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. या व्हीडिओवरुन गेल्या काही तासांपासून राजकारण चांगलंच तापलंय. या प्रकरणात पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. या अशा प्रकारानंतर शीतल म्हात्रे यांनी संताप व्यक्त केलाय. दरम्यान आता शीतल म्हात्रे यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली. या पत्रकार परिषदेत म्हात्रे यांच्यासह शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के उपस्थित होते.

Sheetal Mhatre
Crime News: 'मी सुंदर दिसत नाही,' तिचा अखेरचा मेसेज अन्... डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येने खळबळ

काय म्हणाल्या शितल म्हात्रे...

"व्हायरल व्हिडिओ झाल्यानंतर एक स्त्री म्हणून खरोखर वेदना होत आहेत. आधी एक पत्रकार होती, आणि नंतर काही करण्यासाठी राजकारणात आली, ज्या बाळासाहेब यांच्या विचाराने प्रेरित होऊन एकनाथ शिंदे यांच्या सोबत आली त्यामुळेच मला सोशल मीडियावरुन ट्रोल केले जात असल्याचे," त्या म्हणाल्या.

तसेच "काल मागाठणे येथे प्रकाश सुर्वे यांच्या कार्यक्रमात आले होते. तेव्हा व्हीडिओ मॉर्फ करुन वाईट मेसेजसह व्हीडिओ तयार करण्यात आला. बोलण्यासारखं काहीही नसलं की चारित्र्यावर बोललं जातं हा व्हिडिओ मातोश्री पेजवरुन व्हायरल करण्यात आला असून ही गोष्ट जेव्हा घडली तेव्हा एकनाथ शिंदे यांनी सर्वप्रथम फोन केला आणि तुझा भाऊ तुझ्या पाठीशी उभा आहे, असा विश्वास दाखवला असेही," त्यावेळी म्हणाल्या..

Sheetal Mhatre
Maharashtra Politics: भाजपला शह देण्यासाठी मविआचा मेगा प्लान! राज्यभर सभा घेणार, पुण्यात उद्धव ठाकरेंच्या विराट सभेने श्रीगणेशा

काय आहे प्रकरण....

सोशल मीडियावर शिवसेना (Shivsena) शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ मॉर्फ असल्याचा आरोप शीतल म्हात्रे यांनी केला आहे. आपली बदनामी करण्यासाठी हा खोटा व्हिडीओ तयार करण्यात आला असून ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा यामागे हात असल्याचा आरोप शीतल म्हात्रे यांनी केला होता. रविवारी पहाटे शीतल म्हात्रे यांनी याबाबत दहिसर पोलिसात तक्रार केली होती. या व्हिडिओवर आता शितल म्हात्रे यांनी पत्रकार परिषद घेत खुलासा केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com