
Madhya Pradesh: मध्यप्रदेशातील झाबुआ जिल्ह्यात एका २४ वर्षीय डॉक्टर तरुणीने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. तरुणीचे आई वडिल तिला फोन करत होते, मात्र ती कॉल उचलत नसल्याने कुटूंबियांना संशय आला. यानंतर घरमालकाने जाऊन पाहिल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.
मुलीने गळफास घेतल्याचे दिसताच घर मालकाने पोलिसांना फोन लावला. या प्रकरणात पोलिसांना तरुणीची एक डायरी सापडली असून त्यामधून धक्कादायक खुलासा झाला आहे. (Latest Marathi News)
समोर आलेल्या माहितीनुसार, एका मुलीने गळफास घेत आत्महत्या केल्याची बातमी पोलिसांना मिळाली. त्यानंतर तात्काळ घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांना एका खोलीत युवतीचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत पाहायला मिळाला. निशा गोयल असं तिचे नाव असून या मुलीचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. पोलिसांनी मुलीच्या खोलीची झडती घेतली असता पोलिसांच्या हाती एक डायरी लागल्याचे सांगण्यात येत आहे.
मी सुंदर दिसत नाही असे या डायरीत लिहिले आहे. त्यामुळे अनेकवेळा आत्महत्येचा विचार मनात येतो. दरम्यान, लोकांनी पोलिसांना सांगितले की, घटनेच्या दिवशी निशा दिवसभराची ड्युटी करून सायंकाळी पाच वाजता घरी आली. त्यानंतर ती बाहेर पडली नाही.
दरम्यान, घरमालकाने सांगितलेल्या माहितीनुसार, ९ मार्च रोजी त्याला निशाच्या कुटुंबीयांचा फोन आला. यावेळी त्यांनी निशा फोन उचलत नसल्याचे सांगितले. त्यानंतर मी आणि शेजाऱ्याने निशाचा दरवाजा ठोठावला पण आतून काहीच प्रतिसाद आला नाही. त्यामुळे खिडकीची काच फोडली असता हा संपूर्ण प्रकार समोर आला.. (Madhya Pradesh)
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.