Maharashtra Politics: भाजपला शह देण्यासाठी मविआचा मेगा प्लान! राज्यभर सभा घेणार, पुण्यात उद्धव ठाकरेंच्या विराट सभेने श्रीगणेशा

Maharashtra News : आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर महाविकासआघाडीने मेगा प्लान तयार केला आहे. राज्य भरात महाविकासआघाडीतील पक्षांच्या एकत्रित सभा होणार आहे.
Uddhav Thackeray's first Sabha in Pune
Uddhav Thackeray's first Sabha in Punesaam tv
Published On

Maharashtra Political News: राज्यात होणाऱ्या आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर महाविकासआघाडीने मेगा प्लान तयार केला आहे. राज्य भरात महाविकासआघाडीतील पक्षांच्या एकत्रित सभा होणार आहे. प्रमुख तिन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांमध्ये समन्वय निर्माण व्हावा आणि एकजूट निर्माण व्हावी यासाठी या सभा घेण्यात येणार आहे.

याची सुरुवात पुण्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विराट सभेने होणार आहे. पुण्यात १४ मे रोजी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मविआची भव्य सभा होणार आहे. मविआच्या प्रमुख नेत्यांची उपस्थितीत ही सभा पार पडणार आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ही माहिती दिली आहे.

Uddhav Thackeray's first Sabha in Pune
Pune Accident: पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, भरधाव कारने रिक्षाला उडवलं, एक जण जागीच ठार, ४ गंभीर जखमी

कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत विजय मिळवल्यानंतर 14 मे रोजी पहिल्यांदा महाविकास आघाडीची पुण्यात सभा होणार आहे. यामध्ये महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते सहभागी होणार आहेत. (Latest Marathi News)

Uddhav Thackeray's first Sabha in Pune
Video : उगाच किंग नाही विराट! शतक झळकावताच स्टेडियममध्ये दिसला अद्भुत नजारा; टाळ्यांचा कडकडाट, चाहते नतमस्तक

हवेली कृषी बाजार उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्शवभूमीवर आयोजित मेळाव्यात विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी ही माहिती दिली आहे. १४ मे रोजी छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आहे आणि याच निमित्ताने पुण्यात महाविकास आघाडीची विराट सभा आयोजित करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com