मावळ, ता. १६ ऑगस्ट २०२४
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची जनसन्मान यात्रा आज मावळमध्ये सुरू आहे. मावळमधील तळेगावमध्ये आज पक्षाचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर सभा पार पडली. या कार्यक्रमामध्ये अजित पवार यांचे भाषण सुरू असतानाच एका तरुणाने अजित दादा परत राष्ट्रवादीत या असा फ्लेक्स झळकावल्याने मोठा गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी पोलिसांनी तात्काळ तरुणाच्या हातातून फ्लेक्स काढून घेतला. नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर..
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची जनसन्मान यात्रा आज मावळमध्ये सुरू आहे. मावळच्या तळेगावमध्ये अजित पवार यांचे बैल गाडीतून रॅली काढून जंगी स्वागत करण्यात आले. यानंतर झालेल्या सभेत अजित पवार यांचे भाषण सुरू असतानाच एका कार्यकर्त्याने दादा राष्ट्रवादीत परत या असा आशय असलेले फ्लेक्स फळकावल्याने मोठा गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले.
व्यासपीठावर अजित पवार बोलत असतानाच एका तरुणाने आवाज निष्ठावंत कार्यकर्त्याचा, दादा याना परत आपल्या राष्ट्रवादीत असा आशय असलेले फ्लेक्स झळकावले. यावेळी पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत तरुणाच्या हातातील फ्लेक्स काढून घेतले. यावेळी अजित पवार यांनीही भाषण थांबवून थांब रे तुज्याशी बोलतो नंतर, असे म्हणत तरुणाला शांत केले.
दादांची फटकेबाजी!
"भाऊ ओवाळणी टाकतो ती परत घेत नसतो. त्यामुळे विरोधक जे सांगत आहेत पैसे परत घेणार आहेत, तर असं काहीही होणार नाही. येणाऱ्या विधानसभेत तुम्ही जर आम्हाला मतदान केलं तर गेले पाच वर्षे ही योजना चालू ठेवणार असाच शब्द देतो. दोन कोटी महिलांना पैसे देणार आहोत. बजेटमध्ये तरतूद केलेली आहे. कोणी काहीही म्हणेल, आम्ही पैसे परत घेणार नाही, असे म्हणत या सभेमध्ये अजित पवार यांनी जोरदार फटकेबाजी केली.
तसेच उपस्थित महिलांनी गुलाबी फेटे घातल्याने दादांनी महिलांना खूप भारी दिसताय अशी खास टिप्पणी केली. घरी गेल्यावर नवरे पण ओळखणार नाही, अशा दिसत आहेत. असे अजित पवार म्हणाले अन् सभेमध्ये एकच हशा पिकला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.