Vijay Shivtare
Vijay Shivtare Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: बारामती लोकसभेत नवा ट्वीस्ट! आरपारची लढाई म्हणत विजय शिवतारेंनी दंड थोपटले; तिरंगी लढत होणार?

मंगेश कचरे

Baramati Loksabha Election 2024:

बारामती लोकसभा मतदार संघात पवार विरुद्ध पवार अशी लढत होण्याची चिन्हे दिसत आहेत. बारामतीमध्ये महायुतीकडून सुनेत्रा पवार तर महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. अशातच आता तिसऱ्या उमेदवाराने मैदानात उतरण्याची घोषणा केली आहे. माजी मंंत्री विजय शिवतारे यांनी आता आरपारची लढाई म्हणत थेट अजित पवारांना आव्हान देण्याची घोषणा केली आहे.

काय म्हणाले विजय शिवतारे?

माजी मंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी महिला दिनानिमित्त पुरंदर तालुक्यात 'खेळ खेळू पैठणीचा' या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे संकेत दिले आहेत. आपण पवार कुटुंबियांनाच का मतदान करावे? बारामती मतदार संघ कोणाचा सातबारा नाही, असे विजय शिवतारे म्हणालेत.

लढत तिरंगी होणार?

तसेच बारामती लोकसभा मतदारसंघात पवारांच्या विराधात तब्बल 5 लाख 80 हजार मतदार आहेत. त्यामुळे येणाऱ्या लोकसभेत आरपारची लढाई करणार आहे. तुमच्या सर्वांची साथ हवी, असे म्हणत सासवडमधील पालखीतळावर अजित पवार यांनी केलेला अपमान केवळ विजय शिवतारेंचा नसून तो पुरंदरच्या स्वाभिमानी जनतेचा केला आहे, असे विजय शिवतारे म्हणालेत. त्यामुळे बारामती लोकसभेची निवडणुक तिरंगी होणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

अजित पवार- विजय शिवतारे कट्टर विरोधक..

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांचा वाद सर्वश्रुत आहे. आधी राष्ट्रवादीत असलेले विजय शिवतारे हे २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेकडे गेले होते. त्यावेळी अजित पवार यांनी थेट आव्हान देऊन शिवतारेंचा पराभव केला होता. त्यामुळेच शिवतारे अजित पवारांविरोधात दंड थोपटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Voting LIVE : लोकसभेच्या पाचव्या टप्प्यासाठी थोड्याच वेळात मतदान

Heavy Rain Alert : मान्सून अंदमानात दाखल होताच वातावरण बदललं; या भागात तुफान पाऊस कोसळणार

Rashi Bhavishya: आजचे राशिभविष्य, २० मे २०२४ : मेषसह ४ राशींना मिळणार नशीबाची उत्तम साथ, तुमची रास कोणती?

Horoscope Today: तुमच्यासाठी सोमवार सुखाचा ठरेल की दुखाचा? वाचा राशिभविष्य

31km मायलेज, Z सीरीज इंजिन; पहिल्यांदाच सनरूफसह येणार मारुतीची नवीन कार

SCROLL FOR NEXT