वार - सोमवार. तिथी - शु.द्वादशी. नक्षत्र - चित्रा. योग - सिद्धी. करण - बालव. रास - कन्या १६.३५ नंतर तूळ. सोमप्रदोष. दिनविशेष - १२ पर्यंत चांगला.
"साथी हात बढाना, एक अकेला थक जायेगा मिलकर बोझ उठाना" हेच ब्रीद वाक्य घेऊन पुढे चला. आपले सहकारी, हाताखालील वर्ग, नोकर-चाकर यांना बरोबर घेऊन चालण्याचा दिवस. अन्यथा सर्व कामे आपल्यावर पडतील आणि मनस्ताप होईल.
शेअर मार्केटमध्ये योग्य विचार करून पैसे गुंतवणूक करा. संततीसाठी आजचा दिवस सोन्याचा. नवीन काहीतरी त्यांच्यासाठी कराल. कलाक्षेत्रात प्रवेश घेण्यासाठी किंवा त्यांच्या प्रगतीसाठी आज आपले योगदान विशेष ठरेल.
पालखी, उत्साह, सोहळे यामध्ये आज व्यस्त राहाल. काही वेळेला आपण केलेल्या गोष्टींचे तितकेसे श्रेय मिळत नाही, अशीही मनात भावना येईल. पण सातत्याने कार्यरत राहा.
"कुणी आलं का सांगाल का, सूचवाल का माझ्या मना" अशी आज भावना राहणार आहे. अनेक गोष्टी कराव्याशा वाटत आहेत, स्वतःवर विश्वास पण वाटतो आहे, पण आपल्याबरोबर कोणाची तरी साथ असावी ही भावना मनात राहील.
कुटुंबीयांवर वर्चस्व राहील. करायचे तर आहेच पण श्रेय तुम्हाला घ्यायला आवडते. त्यामुळे खूप वेळेला आपला हा दानशूरपणा उदयाला येतो. तोच आजचा दिवस असे म्हणायला हरकत नाही.
"ऋतू हिरवा-ऋतू बरवा" असा आजचा दिवस आहे. मनमोहरलेलेच आहे आणि ते तसेच राहील. आपल्याबरोबर आपणच जास्त सुखी असतो ही जाणीव घट्ट होईल.
आश्चर्यकारक घटना घडतील. ज्याची कल्पना केली नाही अशा गोष्टी मनात येतील. पण सगळ्याच मनासारख्या असतील असे नाही. न करता सुद्धा इथे आपल्याला जबाबदार धरले जाईल.
ज्येष्ठांसाठी आजचा दिवस चांगलाच म्हणावा लागेल. नातवंडांच्या कौतुकाने दिवस भारला जाईल. सुट्टीची मजा लुटाल. नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील .अनेक प्रकारचे लाभ होण्याचा आजचा दिवस आहे.
"चल दे धक्का" असा दिवस आहे. कामामध्ये गढून जाल. डोंगराएवढे काम उपसले जाईल. त्याचे विशेष कौतुकही होईल. मन लावून काम करा, मेहनत करा हाच आजचा अजेंडा आहे.
"अजीब दासता हैं यें, कहा शुरु कहा खतम्, यें मंजीले हैं कौनसी?" देवाने नक्की काय पदरात दान दिले आहे? याचा विचार करण्यात आज गढून जाल. चांगल्या गोष्टी घडताना "याची देही याची डोळा" पाहाल.
"अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको" रे असा आजचा दिवस आहे. कितीही झाले तरी सुद्धा वाईटावर चांगल्याची मात करून हव्या असलेल्या गोष्टी घडवून आणाल. व्यवसाय - व्यापार यामध्ये विशेष यशाचा आजचा दिवस आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.