Fire News : महाड एमआयडीसीत भीषण आग, धुराचे लोट आकाशाला भिडले; चंद्रपूरमध्ये घराचा अक्षरशः झाला कोळसा

Mahad Fire News : भंगारच्या गाेदामात ठेवलेल्या केमिकलमुळे नागरिकांना आणि एमआयडीसी अग्नीशमन दलांस आगीवर नियंत्रण आणण्यात अडचणी निर्माण झाल्या.
fire broke in mahad midc
fire broke in mahad midcsaam tv

सचिन कदम / संजय तुमराम

Mahad Fire News :

महाड (mahad) आणि चंद्रपूर (chandrapur) शहरात लागलेल्या आगीत लाखाे रुपयांचे नुकसान झाले आहे. महाड येथील एमआयडीसीमधील शेटलटोळी गाव हद्दीत बंद एका भंगारच्या गाेदामाला भीषण आग लागली. नागरिकांनी धाव घेत आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. दुसरीकडे चंद्रपूर शहरातील बंगाली कॅम्प भागात लागलेल्या भीषण आगीत घराची राखरांगोळी झाली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

महाड एमआयडीसी मधील शेलटोली गाव हद्दीतील जुन्या बंद असलेल्या भंगारच्या गाेदामाला आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीचे लोळ परिसरात पसरून एम्बायो कंपनीने लावलेली झाड जळून खाक झाली. तसेच एका मोबाईल टॉवरचे देखील नुकसान झाले आहे.

fire broke in mahad midc
Success Story : द्राक्षच्या पंढरीत तैवान पेरुची लागवड, अल्पावधीत शेतक-याने कमावले 8 लाख

भंगारच्या गाेदामात ठेवलेल्या केमिकलमुळे नागरिकांना आणि एमआयडीसी अग्नीशमन दलांस आगीवर नियंत्रण आणण्यात अडचणी निर्माण झाल्या. केमिकलच्या धुरामुळे परिसरातील नागरीक आणि बचाव पथकांना मोठा त्रास सहन करावा लागला. एमआयडीसी अग्नीशमन दलांनी अथक प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण आणले. (Maharashtra News)

चंद्रपूर : आगीत घराची राखरांगोळी

चंद्रपूर शहरातील बंगाली कॅम्प भागात भीषण आगीत घराची राखरांगोळी झाली. रविवारी रात्री उशिरा मालती राजू मंडल यांच्या मालकीच्या घराला अचानक आग लागली. काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले. या घटनेची माहिती नागरिकांनी अग्निशमन दलाला दिली.

चंद्रपूर शहर मनपाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत घरातील वस्तूंची राख झाली हाेती. हे घर एका वृद्ध दांपत्याचे असल्याची माहिती पुढे आली आहे. या प्रकरणी पोलिस घातपात या दृष्टिकोनातूनही तपास करत आहे.

Edited By : Siddharth Latkar

fire broke in mahad midc
Lok Sabha Election 2024 : भावनिक होऊन निवडणुका जिंकता येत नाहीत; प्रविण दरेकर यांचा उद्धव ठाकरेंना टाेला (पाहा व्हिडिओ)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com