MVA Seat Sharing  Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: महाविकास आघाडीचं जागावाटप महिनाभरात पूर्ण होणार? उद्धव ठाकरेंची काँग्रेस हायकमांडशी चर्चा; बैठकीत काय ठरलं?

Vidhan Sabha Election MVA Seat Sharing News: विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची मोर्चेबांधणी सुरू आहे. आता महाविकास आघाडीचं जागावाटप महिन्याभरात पूर्ण होणार असल्याची माहिती मिळतेय.

Rohini Gudaghe

प्रमोद जगताप, साम टीव्ही नवी दिल्ली

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ठाकरे यांनी इंडिया आघाडीच्या अनेक बड्या नेत्यांच्या भेटी घेतलेल्या आहेत, जागावाटप बाबत देखील चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. महाविकास आघाडीचं जागावाटप महिन्याभरामध्ये पूर्ण होणार असल्याची माहिती साम टीव्हीला सुत्रांनी दिलीय.

महाविकास आघाडीचं जागावाटप

उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यात काल ७ ऑगस्ट रोजी त्यांची मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत झालीय. यावळी ठाकरे यांनी महाविकास आघाडीचं जागावाटपासंदर्भात चर्चा केल्याची माहिती समोर आलीय. विधानसभेसाठी महाविकास आघाडीचं जागावाटप ‘१० सप्टेंबरच्या आत जागावाटप पूर्ण व्हायला हवं‘, अशी इच्छा मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी इच्छा व्यक्त केल्याची माहिती मिळत (Maharashtra Politics) आहे.

उद्धव ठाकरेंची काँग्रेस हायकमांडशी चर्चा

'जागावाटप लवकर पूर्ण झालं तर प्रचाराला जास्त वेळ मिळेल', काही जागांची अडचण असेल तर वरिष्ठ नेते बसून तोडगा काढू. पण, निर्णय लवकर (Vidhan Sabha Election) व्हावा. आधी लढलेल्या काही जागांची वेळ पडल्यास अदलाबदल करायची गरज पडल्यास ती करण्यावर तिन्ही पक्षातील नेत्यांचं एकमत झालेलं आहे. लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुका कशा टाळता ( MVA Seat Sharing) येतील, त्यावर देखील बैठकीत चर्चा झाल्याची माहिती साम टीव्हीला सुत्रांनी दिलीय.

उद्धव ठाकरेंची काँग्रेस हायकमांडशी चर्चा

उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्याचा आज अखेरचा दिवस आहे. ते आज देशाचे उपराष्ट्रपती जगडिप धनखड यांची भेट घेणार (Udhhav Thackeray Meeting With Mallikarjun Kharge) आहेत. ही भेट सदिच्छा भेट असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिलीय. तर, दुपारनंतर उद्धव ठाकरे हे काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळतेय. तर इंडिया आघाडीतील इतर काही महत्त्वाच्या पक्षांचे नेते आज उद्धव ठाकरे यांना भेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्याला आज रेड अलर्ट, धो धो पाऊस कोसळणार

Weight Loss Facts: उपाशी राहिल्याने वजन कमी होतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारणं

Horoscope Saturday Update : शत्रु त्यांचे काम करतील, तुम्ही तुमचे काम करा; आजचे राशीभविष्य

Indian Railway: रिल्स बनवणाऱ्यांनो ऐकलं का? रेल्वे स्टेशनवर रील बनवाल तर याद राखा, नेमकी काय कारवाई होणार?

अगं बाई! विदेशातही पोहोचला महाराष्ट्राचा ठसका! इटालियन महिलांनी गायले मराठी गाणं 'आता वाजले की बारा'

SCROLL FOR NEXT