Asim Sarode On Ajit Pawar Group 
मुंबई/पुणे

Asim Sarode On Ajit Pawar Group: अजित पवारांचा गट बेकायदेशीर, कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांचे मत

Deputy CM Ajit Pawar: अजित पवार यांच्यामुळे राज्यात मोठा राजकीय पेच निर्माण झाला आहे.

Priya More

अक्षय बडवे, पुणे

Pune News: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (NCP Leader Ajit Pawar) यांनी बंडखोरी करत काही आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde- Fadnavis Government) पाठिंबा दिला. अजित पवार यांच्या या निर्णयामुळे राज्यातील राजकारणात मोठा भूकंप झाला. अजित पवारांच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादीमध्ये सध्या अजित पवार गट (Ajit Pawar Group) आणि शरद पवार गट (Sharad Pawar Group) असे दोन गट पडले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर देखील दावा केला. अजित पवार यांच्यामुळे मोठा राजकीय पेच निर्माण झाला आहे. अशामध्ये अजित पवार यांचा गट बेकायदेशीर असल्याचे मत प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ असीम सरोदे (legal expert asim sarode) यांनी व्यक्त केले आहे.

असिम सरोदे यांनी सामला प्रतिक्रिया देताना सांगितले की, 'सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातील अनव्यार्थ संदर्भ म्हणून घेतला तर दिसते की अजित पवार यांचा गट बेकायदेशीर आहे. कारण त्या गटाला स्वतःची अशी ओळख नाही. खरे तर याची माहिती शरद पवार यांना सुद्धा आहे. त्यामुळे असंविधानिक गोष्टी जर होत असतील तर अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस गट हा बेकायदेशीर आहे.'

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी रविवारी मोठा निर्णय घेत महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप केला. अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारसोबत हातमिळवणी करत राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. अजित पवारांसोबत राष्ट्रवादीच्या ७ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीचे ४० आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा अजित पवार यांनी केला आहे. अजित पवार यांच्या गटातील आमदार आणि नेत्यांनी त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष देखील बनवले. अशामध्ये अजित पवार यांनी पक्ष आणि पक्षाच्या चिन्हावर दावा केला आहे.

तर दुसरीकडे शरद पवारांच्या नेतृत्वाखालील पक्षाने ९ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यासाठी विधानसभा अध्यक्षांकडे याचिका दाखल केली आहे. यावर भाष्य करताना वकील दिलीप तौरे यांनी सांगितले की, 'एखाद्या पक्षात दोन गट पडले तर मूळ पक्ष कोणता आहे, हे पाहावे लागेल. त्यानंतर व्हिप कोणाचा लागू होईल हे पाहावे लागेल. अशावेळी दोन्ही गट आम्हीच मूळ पक्ष आहोत, असा दावा करतात. या सर्व बाबींवर निवडणूक आयोग निर्णय घेतो. यामुळे दोन्ही गट निवडणूक आयोगाला अर्ज करतात. त्यानंतर आयोग निर्णय घेतो.'

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: मराठी बोलल्यानं तिकीट नाकारलं! नाहूरमध्ये नेमकं काय घडलं? - VIDEO

Ramdas Athawale : एकनाथ शिंदेंची केंद्रात रवानगी होणार? रामदास आठवलेंच्या दाव्यामुळे राज्यात खळबळ,VIDEO

Shocking News: पालकांनो, मुलांना पुऱ्या देताय सावधान! पुरीनं घेतला मुलाचा जीव- VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा देवेंद्र फडणवीसांशी अबोला आणि दुरावा? पडद्यामागे काय सुरु? VIDEO

Kalyan Fire News: कल्याणमध्ये इमारतीच्या १३ व्या मजल्यावर भीषण आग, रहिवाशांमध्ये घबराट,VIDEO

SCROLL FOR NEXT