Mumbai Ganeshotsav Mandal : गणेश भक्तांना गणेशोत्सवाचे (Ganeshotsav 2023) वेध लागले आहे. दोन महिन्यांवर हा सण येऊन ठेपला आहे. या सणांच्या तयारीला देखील सुरुवात झाली आहे. ठिकठिकाणी कार्यशाळेमध्ये गणेशाच्या मूर्ती तयार करण्याचे काम सुरु आहे. अशामध्ये मुंबईतील गणेशोत्सव मंडळांना मोठा दिलासा मिळाला आहे.
यावर्षी मुंबईमध्ये 4 फुटांवरील 'प्लॅस्टर ऑफ पॅरिस' म्हणजेच पीओपीच्या गणेश मूर्तींना (POP Ganesh Idols) परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे यावर्षी तुम्ही पीओपीच्या बाप्पाच्या मूर्ती घरी किंवा गणेशोत्सव मंडळामध्ये (Ganeshotsav Mandal) आणू शकता.
पीओपीला पर्याय सुचवण्याबाबतची मार्गदर्शक तत्व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून अद्यापही जाहीर करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे गणेशाच्या 4 फुटांवरील मूर्तींसाठी पीओपीचा वापर करता येणार आहे. पण चार फुंटापेक्षा कमी उंचीच्या गणेशाच्या मूर्तांसाठी बंधन असणार आहेत. 4 फुटांपेक्षा कमी उंचीच्या गणेशाच्या मूर्ती या शाडू मातीच्याच असणे बंधनकारक आहे.
मुंबई महानगर पालिकेकडून गणेशाची मूर्ती साकारणारे मूर्तिकार आणि मूर्ती विक्रेत्यांसाठी आजपासून 'एक खिडकी' पद्धतीने ऑनलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. इको फ्रेंडली गणेशमूर्तींना चालना देण्यासाठी पालिकेकडून मोफत शाडू माती आणि जागा उपलब्ध करून देणार आहेत. यावर्षी गणेशोत्सवाला 19 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. गणेश चतुर्थी 19 सप्टेंबर 2023 रोजी असणार आहेत तर अनंत चतुर्दशी 28 सप्टेंबर 2023 रोजी असणार आहे. या दहा दिवसांच्या गणेशोत्सव सणामध्ये राज्यभरात सगळीकडे आनंदाचे वातावरण असते. गणेशक्तांसाठी हा सण खूपच महत्वाचा असतो.
दरवर्षी मुंबई महानगर पालिकेकडून गणेशोत्सवापूर्वी नियमावली जाहीर केली जाते. यामध्ये गणेशोत्सव मंडळांना काही नियम दिले जातात त्या नियमांचे त्यांना पालन करावे लागते. या नियमांमध्ये गणेशाच्या मूर्तीची उंची आणि त्या तयार करण्यासाठी कोणत्या मातीचा वापर करावा याचा देखील समावेश असतो. मागच्या वर्षी देखील गणेशोत्सव मंडळांना महापालिकेने पीओपीच्या मूर्तींसाठी परवानगी दिली होती. त्यावेळी देखील मूर्तींच्या उंचीचे बंधन ठेवण्यात आले नव्हते. दरवर्षी पालिकेकडून गणेशभक्तांना पीओपीच्या मूर्ती खरेदी न करता शाडू मातीच्या मूर्ती खरेदी कराव्यात, असे आवाहन केले जाते.
- पीओपीच्या मूर्तीचे नैसर्गिकरीत्या विघटन होत नाही. त्यामुळे विजर्सनानंतर प्रदूषण होते.
- या मूर्तींवर रासायनिक रंगांचे लेपन केलेले असते. त्यामुळे विसर्जनानंतर जलप्रदूषण झाल्याने जलचरांनाही धोका निर्माण होतो.
-पीओपीच्या मूर्ती पाण्यात लगेच विरघळत नसल्याने या मूर्तीचा गाळ विहिरी, तलाव, जलाशयात साचून नैसर्गिक जिवंत झरे बंद होतात.
- घरगुती गणेशाची मूर्तीची उंची दोन फुटांची असावी. त्यामुळे या मूर्तींचे पालिकेच्या कृत्रिम तलावात सहजरित्या विसर्जन करता येते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.