Maharashtra Politics x
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : ठाकरे गटाला कल्याणमध्ये खिंडार, नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा शिंदेसेनेत प्रवेश

Maharashtra Political News : उद्धव ठाकरे यांच्या ठाकरे गटाला कल्याणमध्ये मोठा धक्का बसला आहे. माजी नगरसेवकांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

Yash Shirke

  • कल्याणमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसला

  • माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश

  • कल्याण-डोबिंवलीमध्ये शिंदेसेनेची ताकद वाढली

विकास काटे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Maharashtra : बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधू यांचा मोठा पराभव झाला. या निवडणुकीमध्ये त्यांना एकही जागा मिळाली नाही. तब्बल २० वर्षांनी एकत्र आल्यानंतर ठाकरेची ताकद वाढेल असे म्हटले जात होते. पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. एका बाजूला हा धक्का बसला असताना, दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदे यांनी झटका दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. उपमुख्य एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम संपन्न झाला आहे. शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे यांच्यासोबत कल्याण ग्रामपंचायत पदाधिकारी महेश पाटील, प्रकाश म्हात्रे, नगरसेविका प्रेमा प्रकाश म्हात्रे, प्रमिला मुकेश पाटील, शैलजा भोईर कल्याण ग्रामीणमधून सामील झाले आहेत.

एकनाथ शिंदे यांनी यांनी प्रवेशाच्या वेळी सर्वांचे स्वागत केले. 'सर्वांनी चांगला निर्णय घेतला. कौटुंबिक नाते खाऱ्या अर्थाने होते. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मतदार संघात आहे. त्यांचे स्वागत करतो. दुसऱ्या इनिंगमध्ये विकासाला त्यांनी पाहिले आहे. योजनाच्या माध्यमातून बदल घडवला आहे. कल्याणकारी राज्य घडवले. या पुढे त्यांचे प्रश्न सोडवले जातील', असे एकनाथ शिंदे म्हणाले.

बेस्ट पतपेढी निवडणुकांवरुन एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर निशाणा देखील साधला. बेस्ट निवडणूक.. जे काम करणात त्यांना पुढे नेणार, लोकांना काम करणार लोक हवे आहेत. सर्व स्पीड ब्रेकर काढून टाकले आहेत. तिकडे ईव्हीएमवर शंका घेतात. आता इकडे काय बोलणार? ही निवडणूक बॅलेट पेपरवर झाली आहे, असे वक्तव्य उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thamma Cast Fees : रश्मिका मंदाना की आयुष्मान खुराना; 'थामा'साठी कोणी घेतलं तगडे मानधन?

BEL Recruitment: सरकारी कंपनीत नोकरीची संधी; पगार १ लाख ४० हजार रुपये; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Maharashtra Live News Update: एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर, कारण अस्पष्ट

दिवाळीनंतर सोन्याचे भाव वधारले; चांदीचा दर जैसे थे, आठवड्याच्या शेवटी सोनं कितीनं महागलं?

Maharashtra Politics: पुण्यात शरद पवारांना मोठा धक्का, बडा नेता साथ सोडण्याच्या तयारीत; 'धनुष्यबाण' घेणार हाती

SCROLL FOR NEXT