Uddhav Thackeray Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: मविआच्या नेत्यांचे फोटो वापरले, ठाकरे गटाची शेकापविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

Maharashtra Assembly Election 2024: उरण आणि पनवेल विधानसभा मतदारसंघातील अपप्रचारबाबत ठाकरे गटाची निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Priya More

वैदेही काणेकर, मुंबई

विधानसभा निवडणुकीदरम्यान काही राजकीय पक्षांमधील वाद समोर येत आहेत. शिवसेना ठाकरे गटाकडून शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवारांची निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. उरण आणि पनवेल विधानसभा मतदारसंघातील अपप्रचारबाबत ठाकरे गटाची निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे उरण आणि पनवेल विधानसभा मतदारसंघातील ठाकरे गट आणि शेतकरी कामगार पक्ष यांच्यामध्ये वाद रंगला आहे.

उरण विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि ठाकरे गटाचे उमेदवार मनोहर भोईर असताना शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार प्रीतम म्हात्रे महाविकास आघाडीतील नेत्यांचे फोटो वापरत असल्याचे माहिती समोर आली आहे. याप्रकरणी ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे धाव घेत तक्रार दाखल केली.

पनवेल मतदारसंघामध्ये देखील अशीच परिस्थिती आहे. याठिाणी शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील हे देखील महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेत्याचे फोटो वापरत असल्याने ठाकरे गटाकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. प्रचारात नेत्यांचे फोटो वापरून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करून आचारसंहितेचा भंग करत असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.

शिवसेना ठाकरे गटाने शेकापचे उमेदवार प्रीतम म्हात्रे आणि बाळाराम पाटील यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. अलिबाग येथे शेकापच्या उमेदवारांना ठाकरे गटाने पाठिंबा दिला आहे. तर उरण, पेण आणि पनवेल येथे शेकापने तसेच ठाकरे गटाने देखील उमेदवार दिले आहेत. त्यामुळे या मतदारसंघामध्ये ठाकरे गट आणि शेकापमध्ये सामना रंगला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MNS: मराठी भाषेवरून व्यावसायिकानं राज ठाकरेंना डिवचलं; ५ तारखेनंतर करेक्ट कार्यक्रम करणार, मनसे नेत्याचं प्रत्युत्तर

Ind vs Eng : बेन स्टोक्ससोबत भरमैदानात बाचाबाची; रविंद्र जडेजानं सांगितलं नेमकं कारण

Ashadhi Ekadashi Upvas: आषाढी एकादशीला जास्त मेहनत न घेता घरीच बनवा हे ६ सोपे पदार्थ

Hruta Durgule : महाराष्ट्राची क्रश हृता दुर्गुळे सध्या काय करते ?

Jalebi Recipe: घरी आलेल्या पाहुण्यांसाठी ३० मिनिटात बनवा खमंग जिलेबी, नोट करा रेसिपी

SCROLL FOR NEXT