Rupali Patil To Join Thackeray Group Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: रुपालीताई, अजून किती मुस्कटदाबी सहन करणार? ठाकरे गटाकडून पक्ष प्रवेशाची ऑफर

Rohini Gudaghe

अक्षय बडवे, साम टीव्ही पुणे

लोकसभेनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच बदलत असल्याचं पाहायला मिळत आहे. आता लोकसभेनंतर विधानसभेची धामधूम सुरू झाली आहे. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी अजित पवार गटाच्या प्रवक्त्या रूपाली पाटलांना ठाकरे गटात येण्याची ऑफर दिली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी त्यांच्या अधिकृत X या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट केली (Maharashtra Politics) आहे. या पोस्टमधूनच त्यांनी रूपाली पाटलांना शिवसेनेत येण्याची ऑफर दिल्याचं दिसत आहे. रुपाली पाटील या राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाच्या प्रवक्त्या आहेत. दरम्यान सुषमा अंधारेंनी रूपाली पाटील (Rupali Patil) यांच्यासाठी केलेली सोशल मीडिया पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे.

सुषमा अंधारेंच्या पोस्टमध्ये नेमकं काय?

सुषमा अंधारेंनी त्यांच्या या पोस्टमध्ये निष्कलंक चारित्र्य, उत्तम जनसंपर्क तसंच निडरता, रोखठोक आणि नेत्यांच्या मागेपुढे करून नाही, तर लोकांत मिसळून काम करणारी लढाऊ कार्यकर्ता म्हणून रूपाली पाटील यांचं वर्णन केलं (Rupali Patil To Join Thackeray Group) आहे. या पोस्टमध्ये त्यांनी रूपाली पाटील यांना अजून किती दिवस उपेक्षित राहणार? असं विचारलं आहे. रूपालीताई अजून किती मुस्कटदाबी सहन करणार? असंही त्यांनी विचारलं आहे. निर्णय घेण्याची ही योग्य वेळ असल्याचं सुषमा अंधारेंनी म्हटलं आहे.

अजित पवार गटात रुपाली पाटील यांची मुस्कटदाबी होत आहे का, असा प्रश्न आता निर्माण होत आहे. सुषमा अंधारेंच्या या पोस्टमुळे आता रूपाली पाटील ठाकरे गटाच्या वाटेवर आहेत का, असा प्रश्न निर्माण होत (Sushma Andhare Offers Rupali Patil) आहे. तर ठाकरे गटाचे दरवाजे रूपाली पाटलांसाठी खुले असल्याचं दिसत आहे. आता यावर रूपाली पाटील काय प्रतिक्रिया देतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

Petrol Diesel Price : विधानसभेच्या आधी राज्य सरकार मोठा निर्णय घेणार, पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात?

SCROLL FOR NEXT