Mahavikas Aghadi  Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या नेत्यांवर गंडांतर? कोणकोणते नेते अडचणीत? वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Political News : राज्यात महायुतीचं सरकार येताच सोलापूर जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांचं टेन्शन वाढलं आहे. सोलापूर जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांवर अटकेची टांगती तलवार आहे. मात्र हे प्रकरण काय आहे? त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट....

Saam Tv

मुंबई : राज्यात महायुतीचं भक्कम सरकार आल्यानंतर आता मविआतील अनेक नेत्यांवर अटकेची टांगती तलवार आहे. अशातच मविआतील आणखी काही नेत्यांवर गंडांतर आलंय...हे गंडांतर आहे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला झालेल्या तब्बल 238 कोटी 43 लाख रुपयांचं नुकसानीचं.याबाबत चौकशीत धक्कादायक माहिती समोर आल्यानं आता एकच खळबळ उडालीये...यात अनियमित कर्ज वाटपामुळे बँकेचं कोटींचं नुकसान झाल्याचा ठपका ठेवण्यात आलाय.. या संपूर्ण रकमेची वसुली या प्रकरणातील दोषींकडून करण्याचे आदेश चौकशी अधिकारी डॉ. किशोर तोष्णीवाल यांनी दिलेत. हे प्रकरण नेमकं काय आहे पाहूया...

कोटींचं नुकसान,नेत्यांवर गंडांतर ?

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला 238 कोटी 43 लाख रुपयांचं नुकसान

बँकेला अनियमित कर्ज वाटपामुळे फटका

रकमेची वसुली दोषींकडून करण्याचे आदेश

सोलापूर जिल्ह्यातील दिग्गज नेते अडचणीत

राजकीय हस्तक्षेपामुळे बेफाम कर्जवाटप,तुलनेत रिकव्हरी न झाल्यानं बँक बंद

बँकेवर प्रशासक नेमण्यात आल्याची माहिती

या प्रकरणात कोणाच्या अडचणी वाढणार आहेत पाहूया...

कोण कोण अडचणीत ?

विजयसिंह मोहिते पाटील, माजी उपमुख्यमंत्री

रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार, भाजप

राजन पाटील, माजी आमदार, राष्ट्रवादी (AP)

दिलीप सोपल, आमदार, ठाकरे गट

बबनदादा शिंदे, माजी आमदार

संजय शिंदे, माजी आमदार

सोलापूर जिल्हा बँकेतील अनियमिततेप्रकरणी किशोर तोष्णीवाल यांनी बँकेच्या नुकसानीची रक्कम भरून देण्याची जबाबदारी या नेत्यांवर दिलीय.. मात्र ही किती कोटींची रक्कम आहे? पाहूयात...

नेत्यांवर किती कोटींची जबाबदारी ?

विजयसिंह मोहिते पाटील- 30 कोटी 27 लाख

दिलीप सोपल- 30 कोटी

दीपक आबा साळुंखे- 20 कोटी 72 लाख

सोलापूर जिल्हा बँकेच्या कर्ज वाटपातील अनियमिततेप्रकरणी वसुलीचे आदेश किशोर तोष्णीवाल यांनी दिले आहेत. त्यातच वसुलीचे आदेश दिलेले बहुतांश नेते हे महाविकास आघाडीत आहेत. त्यामुळे या नेत्यांची अडचण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर करणाऱे नेते पुन्हा महायुतीकडे वळणार की कोट्यावधींची नुकसान भरपाई करणार? याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भाजपचे आमदार संजय केनेकर यांची उद्धव ठाकरेंविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

Bigg Boss 19: 'मी टीव्हीचा सुपरस्टार आहे...'; बिग बॉसमध्ये नवा वाद, फरहानाला गौरवने सुनावले खडेबोल

Ind vs Aus: भारताने पुन्हा टॉस गमावला; ऑस्ट्रेलियाच्या संघात ४ मोठे बदल, पाहा प्लेईंग ११

Raj Thackeray : पुण्यामध्ये राज ठाकरे संतापले; पदाधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल, म्हणाले '...तर पदं सोडा'

Kitchen Organize : स्वयंपाकघर व्यवस्थित ठेवण्याचे ५ सर्वोत्तम मार्ग, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT