Sanjay Raut Latest News Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : मोदी-शहांचा राज्यकारभार आणीबाणीपेक्षाही खतरनाक; 'सामना'तून भाजपला चिमटे

Shivsena vs BJP maharashtra News : २५ जून हा दिवस संविधान हत्या दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केंद्र सरकारने केली. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र सामनामधून भाजपला लक्ष करण्यात आलं.

Satish Daud

लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी संविधान बचाव असा नारा देत भाजपला लक्ष केले होते. आता देशात तिसऱ्यांदा एनडीएचे सरकार स्थापन झाल्यानंतर मोठा निर्णय घेण्यात आला. २५ जून हा दिवस संविधान हत्या दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केंद्र सरकारने केली. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र सामनामधून भाजपला लक्ष करण्यात आलं. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी 'रोखठोक'मधून भाजपच्या या निर्णयावर टीका केली.

"मोदी-शहा ५० वर्षांनंतर आणीबाणीच्या थडग्यावरची माती उकरून काढत आहेत. भविष्याचा विचार धूसर झाला की राजकारणी भूतकाळात पळतात. आणीबाणीची भुताटकी मोदी-शहांच्या मानेवर अशाच पद्धतीने बसली आहे. २५ जून हा दिवस यापुढे संविधान हत्या दिवस म्हणून पाळण्याचे या सरकारने ठरवले आहे, पण २०१४ ते २०२४ या काळातल्या आणीबाणीचे काय करायचे?", असा सवाल सामना मुखपत्रातून विचारण्यात आलाय.

"लोकसभा निवडणुकीत मोदी यांनी ४०० पारचा नारा दिला. तो खरा ठरला तर मोदी भारताचे संविधानच बदलून टाकतील, असे विरोधकांनी प्रचारात सांगितले व जनतेने त्यावर विश्वास ठेवला. संविधान वाचविण्यासाठी जनतेने मतदान केले. परिणामी मोदी-शहांच्या पायाखालची बहुमताची सतरंजी लोकांनी ओढून घेतली. त्यामुळे ५० वर्षांपूर्वीची आणीबाणी भाजपने पुन्हा राजकारणात आणली", अशी टीकाही सामनातून करण्यात आली.

"आणीबाणी जाहीर झाली तेव्हा आजचे संविधानप्रेमी अमित शहा सात-आठ वर्षांचे असतील. नरेंद्र मोदी हे तरुण होते, पण या काळात ते भूमिगत होते व वेश पालटून फिरत होते असे सांगितले जाते. आणीबाणीच्या सर्वाधिक झळा ज्यांना बसल्या ते लालकृष्ण आडवाणी हयात आहेत. गेल्या १० वर्षांत ते आणीबाणीप्रमाणेच एक प्रकारे राजकीय विजनवासाचे जिणे जगत आहेत. आडवाणी यांच्यावर जणू आणीबाणीच लादली आहे", असा चिमटाही सामनातून भाजपला काढण्यात आला.

"आणीबाणी हे एक दुष्टचक्र होते. एक राष्ट्रीय संकट होते असे भाजप विचारांच्या काही लोकांना वाटले, पण आणीबाणी लादण्याची वेळ पंतप्रधान इंदिरा गांधींवर का आली? कारण त्या काळात चरण सिंग, जॉर्ज फर्नांडिस, जयप्रकाश नारायण यांची भाषा चिथावणीची व बंडाची होती. यावर त्यावेळच्या पंतप्रधानांनी बघ्याची भूमिका घ्यायला हवी होती, असे वाटते काय?" असा सवालही सामना अग्रलेखातून भाजप नेत्यांना विचारण्यात आला.

"गेल्या 10 वर्षांतील मोदी-शहा यांचा राज्य कारभार हा संविधानाचा आदर करणारा नाही. इंदिरा गांधी यांनी उघडपणे लादलेल्या आणीबाणीपेक्षा तो खतरनाक आहे. आणीबाणीत राजकीय विरोधकांना देशद्रोही ठरवण्याचा प्रकार झाला. तो प्रकार आजही सुरूच आहे. आज निवडणूक यंत्रणेतील घोटाळे व ‘नीट’सारख्या राष्ट्रीय परीक्षांतील घोटाळ्यांनी देश हादरला आहे. मग संविधान हत्येचा नेमका दिवस कोणता?" असा प्रश्न विचारत सामनातून भाजपला चिमटे काढण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aayush Komkar: क्लासवरून घरी येत होता, बेसमेंटमध्ये दोघांकडून अंदाधुंद गोळीबार; आयुष कोमकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट

Anant Chaturdashi 2025 live updates : गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून हेल्पलाइन नंबर जारी

Maharashtra Live News Update: प्रयागराजमध्ये गंगा आणि यमुना नदीच्या पाणी पातळीत वाढ, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

BMC Recruitment: बृहन्मुंबई महानरपालिकेत नोकरीची संधी; या पदांसाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

Mandarmani Beach : पर्यटकांना भुरळ घालणारा मंदारमणी बीच, पावसाळ्यात खुलते सौंदर्य

SCROLL FOR NEXT