रवींद्र धंगेकर यांची हकालपट्टीच्या चर्चेदरम्यान सूचक पोस्ट चर्चेत
'कितीही कट कारस्थाने झाली तरी मागे हटणार नाही' ही पोस्ट चर्चेत
धंगेकरांचा एक्सवरील फोटो देखील बदलला
“सत्यमेव जयते, पुणेकर फर्स्ट” अशा आशयाचा फोटो त्यांनी एक्सवर लावला
पक्षातील अंतर्गत वाद आणि कारवाईच्या चर्चांनी राजकीय वातावरण तापले
पुण्यातील शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर हे गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. त्यांनी महायुतीलमधील बड्या नेत्यांवर आरोप केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या या आरोपांमुळे महायुतीत वाद निर्माण झाल्याची चर्चा आहे. यामुळेच त्यांची शिवसेनेतील हकालपट्टी करण्यात येणार असल्याच्या बातम्या माध्यमांत येत आहेत. महायुतीत दंगा नको, असा कानमंत्र पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी धंगेकरांना दिला होता. मात्र, रवींद्र धंगेकर आपल्या भूमिकेवर ठाम असून पुणेकरांसाठी लढत राहणार असल्याचा निर्धार त्यांनी केला आहे. अशातच आता रवींद्र धंगेकरांनी एक पोस्ट एक्सवरून शेअर करत सूचक संदेश दिला आहे.
या पोस्टमधून त्यांनी तुम्ही कितीही कट कारस्थाने केली आणि त्याची मला आयुष्यात काहीही किंमत मोजावी लागली तरी सुद्धा हा रवींद्र धंगेकर मागे हटणार नाही. सोबत आहेत पुणेकर, लढत राहील धंगेकर..! अशी ठाम भूमिका घेतली आहे. त्यामुळे शिवसेनेतून हकालपट्टी करणार असल्याच्या चर्चेदरम्यान धंगेकरांची पोस्टही चांगलीच चर्चेत आली आहे. याशिवाय आणखी एक पोस्ट त्यांनी केली आहे. या पोस्टमधून माझ्यावर पक्ष कारवाई झाल्याच्या खोट्या बातम्या पेरल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पण पोस्टमधून कोणाचे नाव न घेता ती व्यक्ती कोण आहे, हे फडणवीस साहेबांना माहित असल्याचे म्हटले आहे.
शिवसेना हा वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे.आदरणीय पक्षप्रमुख एकनाथरावजी शिंदे साहेबांनी अन्यायाविरोधात आवाज उठविणाऱ्या शिवसैनिकावर आजपर्यंत कारवाई केलेली नाही.अन्यायाविरोधात लढण्यासाठी त्यांचं नेहमी पाठबळ राहील, असा मला विश्वास आहे. आणि पुन्हा एकदा सांगतो. भगवान महावीरांचे मंदिर आणि जैन बोर्डींगची जागा लुटण्याचा व्यवहार रद्द होऊन भगवान महावीरांच्या मूर्तीवरील कर्जाचा बोजा चढविणाऱ्या व्यक्ती विरोधात कारवाई होत नाही, तोपर्यंत माझा हा लढा सुरूच राहील. तुम्ही कितीही कट कारस्थाने केली आणि त्याची मला आयुष्यात काहीही किंमत मोजावी लागली तरी सुद्धा हा रवी धंगेकर मागे हटणार नाही. सोबत आहेत पुणेकर, लढत राहील धंगेकर..!
२०२४ ला एक जण मिडियामध्ये बातम्या पेरून मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आला होता, तो कोण आहे आदरणीय फडणवीस साहेबांना माहित आहे. आज तोच घोटाळ्यातून वाचण्यासाठी माझ्यावर पक्ष कारवाई झाल्याच्या बातम्या खोट्या बातम्या पेरतोय..! मन में हैं विश्वास..! हम होंगे कमयाब…!!
सर्वात महत्वाचे म्हणजे धंगकेरांनी पक्ष कारवाईच्या खोट्या बातम्या पेरल्या जात असल्याचे म्हटले असले तरी त्यांची पोस्ट सूचक संदेश देत आहेत. त्यांचे एक्सवरील फोटोही बदलला असून, या फोटोच्या जागी आता सत्यमेव जयते पुणेकर फर्स्ट असे लिहिलेले दिसत आहे. यामुळे आता खरंच रवींद्र धंगेकरांवर पक्षातून हकालपट्टीची कारवाई होणार की आणखी काय? हे पाहाणे महत्वाचे असणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.