Sanjay Raut On Eknath Shinde Saam TV News
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: झारखंड दारू घोटाळ्यात उपमुख्यमंत्री शिंदेंच्या निकटवर्तीयाला अटक, संजय राऊतांचा मोठा दावा

Sanjay Raut On Eknath Shinde: संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर निशाणा साधला. झारखंडमधील दारू घोटाळा प्रकरणात अटकेत असलेले अमित साळुंखे हे उपमुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय आहेत.

Priya More

Summary -

  • झारखंड दारू घोटाळ्यात अमित साळुंखे अटकेत

  • संजय राऊतांचानी एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेंबाबत केला मोठा दावा श्रीकांत शिंदे

  • 800 कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा; टेंडर ६५० कोटींनी वाढवले

  • मंत्रिमंडळात ४ मंत्री बदलले जाणार, संजय राऊतांचा दावा

झारखंडमधील दारू घोटाळा प्रकरणात एसीबीने अमित साळुंखेला अटक केली. या प्रकरणाबाबत बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे. एसीबीने अटक केलेले अमित साळुंखे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या जवळचे असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. तसंच, राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा झाला. यासाठी ६०० कोटींनी टेंडर वाढवण्यात आले. या घोटाळ्याचे पैसे श्रीकांत शिंदे मेडिकल फाऊंडेशनला वळवण्यात आल्याचा आरोप देखील संजय राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. संजय राऊत यांनी दावा केला की, 'झारखंडमधून एक टोळी आली. अमित साळुंखे यांना अटक केली. अमित साळुंखे सुमित फॅसिलिटी कंपनीचा संचालक असून या कंपनीला १०८ नंबरच्या रुग्णवाहिका चालवण्याचे कंत्राट देण्यात आले होते. यामध्ये ८०० कोटींचा घोटाळा महारष्ट्रामध्ये झाला. ६५० कोटींनी टेंडर वाढवले'

अमित साळुंखे हे श्रीकांत शिंदेंचे जवळचे असल्याचे सांगत संजय राऊत म्हणाले की, 'अमित साळुंखे श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशनचे आहे. हे सगळे पैसे श्रीकांत शिंदे फाउंडेशनकडे वळवले. ही अटक सहज झाली नाही. हे धागे दोरे कोणापर्यंत पोचले. एकनाथ शिंदे यांच्या मुलाच्या जवळच्या व्यक्तीला अटक करून ते निघून गेले. आता देवेंद्र फडणवीस यांना मंत्रिमंडळ साफसफाईची गरज आहे.',

संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधला. 'मंत्रिमंडळात कोणाला ठेवायचे आणि कोणाला काढायचे हा मुख्यमंत्री यांचा अधिकार आहे. तरी रिमोट कंट्रोल अमित शहा यांच्याकडे आहे. मंत्री मंडळात गोंधळाचे वातावरण सुरू आहे. मी काही दिवसांपासून पाहत आहे. चार मंत्री जाणार आहे. माणिकराव , संजय शिरसाट, योगेश कदम, संजय राठोड यांना देखील जावं लागेल. भ्रष्टाचार, शेतकऱ्यांच्या विरोधात वक्तव्य, घोटाळे, पैशांच्या बॅग घेऊन बसणे हे ओझं फडणवीस यांना पेलवत नाही.', असं राऊत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Shape : तुमचा चेहरा कोणत्या आकाराचा? ही ट्रिक वापरा अन् लगेच ओळखा

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

अंमली पदार्थ अन् २ बायका, फ्लॅटमध्ये रेव्ह पार्टी; खडसेंच्या जावयाला पोलिसांनी रंगेहाथ पकडलं | VIDEO

Saiyaara Box Office Collection : जगभरात 'सैयारा'ची जादू कायम, २०० कोटींच्या क्लबमध्ये केली एन्ट्री

Infertility treatment: गर्भधारणेमध्ये अडथळा येत असलेल्या महिलांसाठी 'ही' थेरेपी ठरेल आशेचा किरण; पाहा काय आहे ही थेरेपी?

SCROLL FOR NEXT