Santosh Shinde Criticized Devendra Fadanvis Saam Tv
मुंबई/पुणे

Sambhaji Brigade On Devendra Fadanvis: देवेंद्र फडणवीस यांना दंगली घडवायच्या आहेत का? संभाजी ब्रिगेडचा संतप्त सवाल, राजकारण तापलं

Rohini Gudaghe

सागर आव्हाड, साम टीव्ही पुणे

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संभाजी ब्रिगेडने संतप्त सवाल केलाय. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते संतोष शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दंगली घडवायच्या का? थेट असं विचारलं आहे. काल देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यावरून संभाजी ब्रिगेड आक्रमक झाल्याचं दिसतंय.

देवेंद्र फडणवीस नेमकं काय बोलले?

देवेंद्र फडणवीस यांनी काल बोलताना, माझ्या आदेशाची वाट पाहू नका? डायरेक्ट ठोकून काढा असं वक्तव्य केलंय. याच वक्तव्यावरून आता संभाजी ब्रिगेडनं त्यांना घेरलं आहे. देवेंद्र फडणवीस यांची ही भाषा गृहमंत्री पदाला शोभणारी नाही. कदाचित राज्याच्या गृहमंत्र्यांना महाराष्ट्रात भाजपची सत्ता आणायची आहे, त्यासाठी दंगली घडविल्याशिवाय पर्याय नाही किंवा वाद घातल्याशिवाय पर्याय नाही, असंच या वक्तव्यावरून कळते, अशी टीका संभाजी ब्रिगेडने (Santosh Shinde Criticized Devendra Fadanvis) केलीय.

संभाजी ब्रिगेड आक्रमक

देवेंद्र फडणवीसांनी नेमकं कुणाला उद्देशुन हे वक्तव्य केलं? असा प्रश्न देखील निर्माण (Maharashtra Politics) होतोय. यावरून संभाजी ब्रिगेडने पुन्हा महायुतीवर निशाणा साधला आहे. म्हणजे जे सरकारवर किंवा फडणवीसांवर टीका करतात, त्यांना कदाचित फोडून काढण्याची भाषा देवेंद्र फडणवीस यांची असेल. हे अत्यंत दुर्दैवी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना हे मान्य आहे का? असा संतप्त सवाल देखील संभाजी ब्रिगेडने केलाय.

महाराष्ट्राची 'माफी' मागितली पाहिजे...,

मी, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना सुसंस्कृत नेता समजत होतो. तो शब्द त्यांनी चक्क पुसून काढला. 'ठोकून काढा' म्हणणे म्हणजे गुंडगिरी दादागिरीला प्रोत्साहन देण्यासारखे आहे. महाराष्ट्राच काय होईल, हे आता सांगता येणार नाही. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या या वक्तव्याचा संभाजी ब्रिगेडच्या वतीने जाहीर निषेध केला गेलाय. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राची 'माफी' मागितली पाहिजे, अशी मागणी देखील संभाजी ब्रिगेडच्या (Sambhaji Brigade) वतीने केली गेलीय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Water Supply : मुंबईत दोन दिवस पाणीबाणी; शहरातील 'या' विभागात पाणीपुरवठा बंद राहणार, वाचा सविस्तर

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक कधी? CM शिंदेंच्या जवळच्या नेत्याने तारीखच सांगितली

Sassoon Hospital: ससून हॉस्पिटलमध्ये आणखी एक घोटाळा; कर्मचाऱ्यांनीच हडपले 4 कोटी 18 लाख रुपये

Ahmednagar Politics: थोरातांचं संगमनेर विखेंच्या रडारवर? सुजय विखे बाळासाहेब थोरातांना आव्हान देणार?

Jalgaon Politics: गिरीश महाजन, सेवानिवृत्ती घ्या! नाहीतर...; ठाकरे गटाच्या नेत्याचा गंभीर इशारा

SCROLL FOR NEXT