Mumbai Rain News: मुंबईमध्ये दोन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. २१ जूनला मुंबईत पहिला पाऊस कोसळला. पहिल्याच पावसात शहरातील विविध भागात पाणी साचले. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला. त्यामुळे मुंबईकरांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
या पावसामुळे राजकीय मैदानही (Maharashtra Politics) चांगलेच तापले असून आरोप- प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. मुंबईत साचलेल्या पाण्यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनामधून शिंदे सरकारवर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे. (Mumbai Rain Update)
काय आहे अग्रलेख...
"रखडलेल्या मान्सूनने (Monsoon) अखेर मुंबईसह महाराष्ट्रात आगमन केले आहे. राज्यात सर्वदूर हातपाय देखील पसरायला सुरुवात केली आहे. त्यामुळे बळीराजाला दिलासा मिळाला असला तरी इकडे मुंबईकर मात्र धास्तावला आहे. कारण शनिवारच्या पहिल्याच पावसाने मुंबईची दाणादाण उडविली आहे आणि त्यात मिंधे सरकारचे सगळे दावे वाहून गेले आहेत; "अशा शब्दात शिंदे- फडणवीस (Shinde Fadanvis Sarkar) सरकारवर घणाघात करण्यात आला आहे.
तसेच "अस्मानी आणि सुलतानी या कोंडीत पुढील दोन-तीन महिने आपला श्वास गुदमरणार, अशी भीती मुंबईकर जनतेला वाटत आहे. शनिवारी रात्री मुंबईत एका तासात 70 मिलिमीटर पाऊस कोसळला हे खरे असले तरी राणाभीमदेवी थाटात केलेले सरकारचे नालेसफाईचे दावे पोकळच ठरले.." अशी खोचक टीकाही करण्यात आली आहे. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.