Pune Fraud News: जमीन खरेदीत नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत फसवणूक; व्यावसायिकाला घातला १३ लाखाचा गंडा

याप्रकरणी तीन आरोपींवर कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस याबाबतचा अधिक तपास करत आहेत...
Latur News Fraud Case
Latur News Fraud CaseSaam tv
Published On

सचिन जाधव, प्रतिनिधी...

Pune Fraud News: रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्‍वर परिसरातील मरळ येथे भागीदारीत जमीन खरेदीतून भरपूर नफा मिळवून देतो असे सांगून एका व्यावसायिकाची साडेतेरा लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे उघड झाले आहे.

याप्रकरणी तीन आरोपींवर कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सलीम सय्यद शहा (वय-30), शर्मिला सलिम शाह (28) व जया सय्यद शहा (36, सर्व रा.कोंढवा, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

Latur News Fraud Case
Sambhaji Bhide Controversial Statement : 15 ऑगस्ट हा काळा दिवस, संभाजी भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य; राष्ट्रगीत, राष्ट्रध्वजावर बोलताना म्हणाले...

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदारास रायगड (Raygad) जिल्हयातील मरळ येथे पार्टनरशिप मध्ये जमीन खरेदीतून चांगला नफा मिळवून देतो असे अमिष आरोपी शहा यांनी दाखवले. त्यानुसार त्यांचा विश्‍वास संपादन करुन त्यांचेकडून एकूण १३ लाख ५० हजार रुपये रोख व ऑनलाइन स्वरुपात घेऊन त्यांना जमीन देण्याचे कबूल केले.

परंतु जमीन किंवा पैसे परत न करता, त्यांनी पैशांची मागणी केली असता, त्यांना आरोपींनी बघून घेण्याची धमकी देऊन शिवीगाळ करुन पैसे परत न देता त्यांची फसवणुक करण्यात आली आहे. या नंतर संबंधित व्यावसायिकाने पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. (Pune News)

Latur News Fraud Case
Mumbai CCTV: मॅनहोलमध्ये उतरला, सफाई करताना अंगावरुन गेली कार, थरारक VIDEO समोर

त्यांच्या तक्रारीनुसार सलीम सय्यद शहा (वय-30), शर्मिला सलिम शाह (28) व जया सय्यद शहा (36, सर्व रा.कोंढवा, पुणे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून असे फसवणूकीचे अनेक गुन्हे समोर येत आहेत, त्यामुळे अशा आमिषांना बळी न पडण्याचे आवाहन पोलिसांकडून दिले जात आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com