मुंबई/पुणे

Ravindra Dhangekar: काँग्रेसची साथ सोडणारे धंगेकर अजूनही 'जनतेच्या मनातील आमदार'; पुण्यात जोरदार बॅनरबाजी

Ravindra Dhangekar Poster: काँग्रेस पक्षाकडून विधानसभा लढल्यानंतर रवींद्र धंगेकर यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला. त्यानंतर पुण्यात त्यांचे बॅनर झळकले आहेत.

Bharat Jadhav

पुण्यात ऑपरेशन टायगर राबवत काँग्रेसला धक्का दिल्यानंतर शिवसेना आणि काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर सुरू झालाय. माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या शिवसेना प्रवेशापासून सुरू झालाय. काँग्रेसची साथ सोडत माजी आमदार रवींद्र धंगेकरांनी शिवसेना एकनाथ शिंदे गटात रोजी प्रवेश केला. पक्षांतरानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी धंगेकर, काय होतास तू काय झालास तू म्हणत त्यांच्यावर टीका केलीय.

शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर पुण्यातील शिंदेगटातील कार्यकर्त्यांमध्ये, पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता असल्याचं म्हटलं जात होतं. पण पुण्यातील कसब्यात धंगेकर यांच्या बॅनरबाजी पाहून शिवसेनेत सर्वकाही आलबेल असल्याचं दिसत आहे. कसब्यात लावण्यात आलेल्या बॅनरमधील मजकूर चर्चेचा विषय ठरलाय. रवींद्र धंगेकर यांच्या समर्थकांकडून वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी होताना दिसतेय. शिंदेगटात पक्षप्रवेश केल्यानंतर धंगेकरांचे पुण्यात बॅनर झळकले आहेत.

यात रवींद्र धंगेकर हे अजूनही जनतेच्या मनातील आमदार असल्याचं म्हटलंय. यातून भाजपवर बाण मारण्यात आली आहेत. विधानसभा निवडणुकीत भाजपच्या हेमंत रासने यांच्याकडून रवींद्र धंगेकर यांचा पराभव झाला होता. त्यामुळे या पोस्टरवरून आमदार रासने यांनाही टार्गेट करण्यात आलंय.

का सोडला काँग्रेस पक्ष?

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेस सोडण्यामागील कारण सांगितलं. काँग्रेस पक्षात १०-१२ वर्षांपासून या पक्षाबरोबर काम केलं. सर्वांनी माझ्यावर प्रचंड प्रेम केलं. पण सत्ता असल्याशिवाय काम होत नाहीत. कार्यकर्ते मतदारांचा आदर करूनच प्रवेश करणार, असे रवींद्र धंगेकर म्हणाले होते.

काय म्हणाले एकनाथ शिंदे

रवींद्र धंगेकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हू इज धंगेकर असा डायलॉग मारला होता. लोकांना आता कळेल हू इज धंगेकर?” अशी मिश्किल टिप्पणी शिंदेंनी केली होती. रवींद्र धंगेकर पुण्यातील लोकप्रिय लोकनेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी त्यांची ओळख कामाने निर्माण झालीय. यांच्या पोटनिवडणुकीवेळी धंगेकरांनी बाजी मारली होती. लोकसेवक काय असतो हे त्यांनी त्या विजयातून दाखवून दिलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT