Navnath Ban And Narayan Rane Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: लायकी काढणाऱ्या निलेश राणेंना नवनाथ बन यांच्याकडून प्रत्युत्तर, थेट नारायण राणेंसोबतचा फोटो शेअर केला, म्हणाले...

Navnath Ban's response to Nilesh Rane's junior comment: नवनाथ बन आणि निलेश राणे यांच्यामध्ये सध्या आरोपप्रत्यारोप सुरूच आहे. निलेश राणे यांनी लायकी काढल्यानंतर नवनाथ बन यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले.

Priya More
  • निलेश राणे यांनी नवनाथ बन यांच्यावर केलेली टीका

  • नवनाथ बन यांनी निलेश राणेंना दिले चोख प्रत्युत्तर

  • नवनाथ बन यांनी नारायण राणेंसोबतचा फोटो शेअर करत दिलं उत्तर

  • निलेश राणे आणि नवनाथ बन यांच्यातील शाब्दिक वादाची चर्चा

गणेश कवडे, मुंबई

राजकारणात प्रत्येक टीकेला शब्दांनीच उत्तर द्यावे लागते असे नाही, कधी एक छायाचित्र आणि त्यासोबतचे मोजके शब्दही बरंच काही सांगून जातात. याचाच प्रत्यय भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांच्या सोशल मीडिया पोस्टमधून आला आहे. शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी नवनाथ बन यांच्यावर वैयक्तिक टीका करत त्यांची लायकी काढल्यानंतर बन यांनी थेट शब्दयुद्धात न उतरता आपल्या खास शैलीत त्यांना उत्तर दिले आहे.

‘नवनाथ बन माझा मित्रबित्र नाही, तो माझा ज्युनिअर आहे. मी २००९ साली खासदार झालो, तेव्हा तो चड्डीत होता. मी ऐऱ्यागैऱ्यांना मित्र बनवत नसतो,’ अशा शब्दांत निलेश राणे यांनी टीका केली होती. त्यानंतर सोशल मीडियावरही त्यांनी नवनाथ बन यांच्यावर निशाणा साधला. या टीकेला प्रत्युत्तर देताना नवनाथ बन यांनी निलेश राणे यांचे वडील आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासोबतचा एका पत्रकार परिषदेतील फोटो शेअर केला.

या फोटोमध्ये नवनाथ बन हे नारायण राणे यांच्या शेजारी बसलेले दिसत आहेत. मात्र, या पोस्टमधील सर्वाधिक लक्षवेधी ठरले ते त्याचे कॅप्शन! ‘ज्युनिअर नवनाथ बन विथ सिनिअर राणेसाहेब’ असे लिहित नवनाथ बन यांनी निलेश राणे यांनी वापरलेल्या ज्युनिअर या शब्दालाच आपल्या उत्तराचे माध्यम बनवले.

विशेष म्हणजे, निलेश राणे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना नवनाथ बन यांनी कोणतीही आक्रमक भाषा वापरली नाही, कोणताही वैयक्तिक आरोप केला नाही. उलट, टीकेतून वापरलेला एक शब्द उचलून त्याला वेगळा संदर्भ देत नारायण राणे यांच्यासोबतचा फोटो पोस्ट केला. शब्दांचा अचूक वापर, प्रसंगावधान आणि समयसूचक विनोद यांचा संगम असलेली ही पोस्ट लक्षवेधी ठरली आहे.

राजकीय वादात अनेकदा आरोप-प्रत्यारोपांची पातळी घसरताना दिसते. मात्र, या प्रकरणात नवनाथ बन यांनी थेट वाद वाढवण्याऐवजी एका छायाचित्रातून आपली भूमिका मांडली. निलेश राणेंच्या ज्युनिअर संबोधनाला त्यांनी दिलेले हे मिश्कील आणि बुद्धिचातुर्यपूर्ण उत्तर सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20 : बिग बॉसच्या घराला मिळाला नवा कॅप्टन; कोण असेल निशाण्यावर? सदस्यांची उडणार झोप

MLC Election Result : नागपूर पदवीधरमध्ये भाजपचा गेम? '2' क्रमांकाचा कोहळेंना फटका, भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगवर प्रश्नचिन्ह

Cycling Benefits: लहानपणीचा खेळ होईल वजन कमी करण्याचं निमित्त, जीममध्ये खूप मेहनत नाही ३० मिनिटं करा सायकलिंग

Maharashtra News Live Update: नाशिक त्रंबकेश्वर येथे आकर्षक फुलांची सजावट आली करण्यात

Shocking : शूज कारखान्यात अग्नितांडव! ४ कामगारांचा होरपळून मृत्यू

SCROLL FOR NEXT