Raj Thackeray on Shivaji Maharaj Statue Saamtv
मुंबई/पुणे

Raj Thackeray: ८ महिन्यांपूर्वी उभारलेला पुतळा कोसळतोच कसा? मालवणच्या घटनेवरून राज ठाकरे यांचा संतप्त सवाल

Priya More

Raj Thackeray on Shivaji Maharaj Statue: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या पुतळऱ्याचे अनावर करण्यात आले होते. मालवणमधील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा पुतळा कोसळल्यावरून महाराष्ट्रामध्ये राजकारण तापले आहे. अशामध्ये आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या घटनेप्रकरणी संताप व्यक्त केला आहे. पुतळा कोसळल्याची बातमी मनाला वेदना देणारी आहे. ८ महिन्यांपूर्वी उभारलेला पुतळा कोसळतो कसा? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

राज ठाकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर भलीमोठी पोस्ट करत राग व्यक्त केला आहे. त्यांनी या पोस्टमध्ये असे लिहिले की, 'मालवण येथील राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची बातमी मनाला वेदना देणारी आहे. महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा, तो देखील अवघ्या ८ महिन्यांपूर्वी उभारला गेलेला, असा कोसळतोच कसा? मुळात ज्या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे, त्याची तपासणी वैगरे काही केली होती का नव्हती ?', असा सावल त्यांनी उपस्थित केला आहे.

तसंच, 'आजच्या घटनेनंतर कुसुमाग्रजांच्या शहरातील 'पाच पुतळ्यांवरची' कविता आठवली. ज्यांना माहित नसेल त्यांच्यासाठी ही कविता मुद्दामून देत आहे.' असे म्हणत राज ठाकरे यांनी मध्यरात्र उलटल्यावर शहरातील पाच पुतळे एका चौथऱ्यावर बसले आणि टिपं गाळू लागलेही कविता पोस्ट केली आहे.

त्यांनी पुढे असे लिहिले की, 'पुतळे, स्मारकं ही फक्त आपल्यासाठी राजकीय सोय राहिली आहे. मी मागे पण अनेकदा म्हणलं होतं की, महाराजांचं खरं स्मारक, हे कुठला तरी भव्य पुतळा नसून, त्यांचे गड-किल्ले हे आहेत. पण महाराजांच्या नावाने राजकारण करायचं, मतं मागायची, सत्ता मिळवायची, आणि मग स्मारकांची टेंडर काढायची, त्यातून काही मिळतंय का, हे बघायचं इतकंच राहिलं आहे. ही प्रतिकांचं राजकारण करणारी व्यवस्था आता लोकांनी उध्वस्त केली पाहिजे. आणि तसं घडलं, तरच आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो असं म्हणू शकतो.', असे म्हणत राज ठाकरे यांनी राग व्यक्त केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

SCROLL FOR NEXT